सैफला पुरस्कार मिळू शकतो, तर अक्षयला का नाही?, या प्रश्नाला सैफ अली खानने दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 22:21 IST2017-04-28T16:51:13+5:302017-04-28T22:21:13+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याला तब्बल २५ वर्षांनंतर त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र त्याच्या या पुरस्कारामुळे सध्या ...

Saif Ali Khan can get the award, why not? | सैफला पुरस्कार मिळू शकतो, तर अक्षयला का नाही?, या प्रश्नाला सैफ अली खानने दिले उत्तर!

सैफला पुरस्कार मिळू शकतो, तर अक्षयला का नाही?, या प्रश्नाला सैफ अली खानने दिले उत्तर!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याला तब्बल २५ वर्षांनंतर त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र त्याच्या या पुरस्कारामुळे सध्या बॉलिवूडमध्ये जणू काही जंगच छेडली गेली आहे. सोशल मीडियावर तर हे प्रकरण जोरदार गाजत असून, त्यामध्ये सैफ अली खानचे उदाहरण अधिकच व्हायरल केले जात आहे. काही नेटिझन्सच्या मते, जर ‘हम तुम’ या चित्रपटासाठी सैफ अली खानला राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो तर अक्षयकुमारला का मिळू नये? असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. आता नेटिझन्सच्या या प्रश्नाला सैफने उत्तर दिले असून, नेटिझन्समध्ये पुरस्कारावरून चांगलेच खलबत्ते सुरू झाले आहेत. 

वास्तविक जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून सैफचा दाखला देत अक्षयकुमारचे नेटिझन्सकडून समर्थन केले जात आहे. सुरुवातीला सैफने याविषयाकडे दुर्लक्ष दिले होते. मात्र आता त्याने याविषयी चुप्पी तोडली आहे. त्याच्या मते, ‘असे म्हणणे चुकीचे आहे. कारण बघायला जरी हा चित्रपट ईझी वाटत असला तरी, त्याची कथा खूपच आधुनिक आणि प्रोगेसिव्ह आहे. कारण या चित्रपटातील कॅरेक्टर त्यांच्या विवेकने सर्व निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे मला मिळालेला पुरस्कार हा उगाचच मिळाला असा कोणी समज करू नये, असेही सैफने स्पष्ट केले. 



काही दिवसांपूर्वी पुरस्कारावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अक्षयकुमारने पुरस्कार परत देण्याचे म्हटले होते. जर कोणाला मला मिळालेल्या पुरस्कारावर आक्षेप असेल तर मी हा पुरस्कार परत देण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले होते. अक्षयने म्हटले मी गेल्या २५ वर्षांपासून हे ऐकत आलो की, जेव्हा केव्हा कोणी जिंकतो तेव्हा त्याच्याविषयी चर्चा रंगायला सुरुवात होते. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. काही लोक नेहमीच वाद निर्माण करीत असतात, असेही अक्षयने म्हटले होते. 

Web Title: Saif Ali Khan can get the award, why not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.