​‘या’ पतौडी पॅलेसचा वारसदार ठरलाय सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:36 IST2016-12-21T14:03:00+5:302016-12-21T16:36:20+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आई झाली. मंगळवारी सकाळी तिने एका मुलाला जन्म दिला. तैमूर अली खान पतौडी असे या ...

Saif Ali Khan and Kareena Kapoor's son Timur have become the heir to Pataudi Palace. | ​‘या’ पतौडी पॅलेसचा वारसदार ठरलाय सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर !

​‘या’ पतौडी पॅलेसचा वारसदार ठरलाय सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर !

लिवूड अभिनेत्री करिना कपूर आई झाली. मंगळवारी सकाळी तिने एका मुलाला जन्म दिला. तैमूर अली खान पतौडी असे या बाळाचे नामकरण करण्यात आले आहे. सैफचे हे तिसरे अपत्य आहे आणि पतौडी घराण्याचा तिसरा वारस. यापूर्वी  पहिली पत्नी अमृतापासून सैफला एक मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम अली खान असे दोन मुले आहे. सैफिनाच्या बाळाच्या जन्मासोबत पतौडी घराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तेव्हा जाणून घेऊ यात पतौडी घराण्याबद्दल काही गोष्टी...


 पतौडी घराण्याचा इतिहास २०० वर्षांपेक्षाही जुना आहे.   हा महल बनून जवळपास ८१ वर्षे पूर्ण झालीत. हरियाणातील गुडगावपासून २६ किलोमीटरवर अरावली डोंगरावर पतोडी महाल आहे.   भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पतौडी संस्थानचे ९ वे नवाब मंसूर अली खान उर्फ टायगर यांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये त्यांचा मुलगा सैफ अली खान याचा १० वा नवाब म्हणून सन्मानित करण्यात आले. पतौडी संस्थानची स्थापना १८०४ मध्ये झाली, याचे पहिले नवाब होते फैज तलब खान.
 

सैफ अली खानचे पूर्वज सलामत खान १४०८ मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले होते. सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी कित्येक लढायांमध्ये मुगलांना साथ दिली होती. त्याची बक्षिसी म्हणून अल्फ खान यांना राजस्थान आणि दिल्लीमध्ये जमीन देण्यात आली होती. १९१७ ते १९५२ मध्ये इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी हे पतौडी संस्थानचे आठवे नवाब होते. इफ्तिखार अली क्रिकेटचे चाहते आणि चांगले क्रिकेटर देखील होते. सुरुवातीला ते इंग्लंड टीमकडून खेळत होते नंतर ते भारतीय संघाचे कर्णधार झाले.



इफ्तिखार यांच्या मृत्यूनंतर पतौडी संस्थानचे ९ वे नवाब त्यांचा मुलगा मंसूर अली उर्फ टायगर झाले. ते भारतीय क्रिकेटचे कर्णधार देखिल होते. सप्टेंबर २०११ मध्ये फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर टायगर पतौडी  आणि शर्मिला टागोर यांचे चिरंजिव सैफ अली खान हा १० वा नवाब झाला. नवाब परिवाराचा पतौडी  पॅलेस नावाने महाल आहे. मंसूर अली उर्फ नवाब पतौडी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दफनविधी महाल परिसरातच करण्यात आला. त्यांच्या इतर पुर्वजांची कबर देखील येथेच आहे.



पतौडी घराण्याचे ८ वे नवाब भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी १९३५ मध्ये हा महाल बांधला. यानंतर त्यांचे सुपूत्र व ९ वे नवाब मंसूर अली उर्फ नवाब पतौडी यांनी विदेशी आर्किटेक्टच्या मदतीने याच्या डिझाईनमध्ये काही बदल केले. नवाब पतौडी यांच्या मृत्यूनंतर  नवाब सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना यांनी या महालच्या देखभालीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.



या महालाच्या आत भव्य ड्रॉर्इंग रूम आहे. सात बेडरू, ड्रेसिंग रूम आणि बिलियर्ड रूमही आहे. राजेशाही अंदाजात हा महाल सजवण्यात आला आहे. या महालात ‘मंगल पांडे’, ‘वीर-जारा’, ‘रंग दे बसंती’ अशा अनेक चित्रपटाचे शूटींगही झाले आहे.
 

 

Web Title: Saif Ali Khan and Kareena Kapoor's son Timur have become the heir to Pataudi Palace.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.