राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:18 PM2020-01-07T17:18:56+5:302020-01-07T17:24:31+5:30

ही अभिनेत्री नॅशनल हॉकी प्लेअरदेखील आहे.

Sagarika ghatge married with cricketer zaheer khan | राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

googlenewsNext

शाहरुख खान सोबत 'चक्क दे इंडिया'मधून घराघरात पोहोचलेली सागरिका घटगे 8 जानेवारीला आपला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. या सिनेमात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आजही सागरिका चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखली जाते. सागरिकाने  प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सागरिकाने सिनेमांपासून दूर गेली. अभिनेत्री शिवाय सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका 'चक दे इंडिया'त दिसली होती. 


सागरिका एका शाही कुटुंबीतील मुलगी आहे. तिचे वडील विजय घाडगे हिंदी  सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहेत. त्याचसोबत सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 2013 मध्ये आलेल्या रश या 'इमरान हाश्मी'सोबत दिसली होती. 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हीट ठरला होता. 


सागरिका आणि जहिरची ओळख एका कॉमन फ्रेंडनच्या माध्यमातून झाली होती. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला. 

Web Title: Sagarika ghatge married with cricketer zaheer khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.