Rajshri Deshpande : मानलं बाई तुला! ‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेनं गावात उभारली शाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:42 PM2022-09-06T13:42:30+5:302022-09-06T13:46:14+5:30

Rajshri Deshpande : ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला तुम्ही आत्तापर्यंत अभिनय करताना पाहिलं आहे. पण अभिनयापलीकडे समाजासाठी खपणारी, सामाजिक जाणीवा असलेली अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे.

sacred games fame rajshri deshpande set up a school for sugarcane workers children | Rajshri Deshpande : मानलं बाई तुला! ‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेनं गावात उभारली शाळा 

Rajshri Deshpande : मानलं बाई तुला! ‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेनं गावात उभारली शाळा 

googlenewsNext

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हिला तुम्ही आत्तापर्यंत अभिनय करताना पाहिलं आहे. पण अभिनयापलीकडे तिचं एक विश्व आहे. समाजासाठी खपणारी, सामाजिक जाणीवा असलेली अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. गावागावात जाऊन तिथल्या शाळांचा विकास करण्याचं महान कार्य राजश्री करते. तिची नभांगण नावाची स्वयंसेवी संस्था आहे. या एनजीओच्या माध्यमातून राजश्रीने अनेक शाळांचं रूपडं बदललं. आता हेच पाहा, ऊस कामागारांच्या मुलांसाठी तिनं स्वखर्चाने शाळा उभी केली. सध्या या महान कार्यासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

काल शिक्षण दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेतील ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्त एका जिल्हा परिषदेच्या शाळेचं उद्घाटन झालं. शाळेची ही अख्खी इमारत राजश्रीनं स्वखर्चाने बांधली. सुमारे 500 लोकसंख्येच्या औरंबादेतील पैठण तालुक्यातील ढोरकीन तांड्यावरची जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली होती. या शाळेत मुलांना बसणंही अशक्य झालं होतं. शाळाचं नाही म्हटल्यावर ऊस तोड कामगार आपल्या मुलांना कामाला सोबत घेऊन जायचे. शाळेतील काही शिक्षकांनी याबाबत राजश्रीची संपर्क साधला. तिला शाळेची अवस्था सांगितली.

गावातील लोकांनी जागा उपलब्ध करून दिली. पण पैशांअभावी ती बांधणार कशी. राजश्री लगेच या कामासाठी पुढे आली. नवीन शाळा बांधून देण्याचं वचन तिने गावकऱ्यांना दिलं आणि काल ते पूर्ण केलं. राजश्रीच्या पुढाकाराने आणि गावऱ्यांच्या सहकार्याने गावात सुसज्ज अशी शाळा बांधून झाली. काल या शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
तुम्हाला माहित नसेल पण राजश्रीने कायपालट केलेली ही तिसरी शाळा आहे. याआधी मराठवाड्यातल्या पांढरी आणि अमनी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा तिने असाच कायापालट घडवून आणला होता. तिच्या या कार्याचं सध्या कौतुक होतंय.
राजश्री एक गुणी अभिनेत्री आहे. अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये तुम्ही तिला बघितलं असेलच. आमिर खानच्या ‘तलाश’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राजश्री देशपांडेने बॉलिवूडमध्ये 'तलाश', 'किक', 'सेक्सी दुर्गा', 'मॉम' आणि 'कॉलर बॉम्ब' असे अनेक चित्रपट केले आहेत. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे. या सीरिजमध्ये ती बोल्ड भूमिकेत दिसली होती.
 

Web Title: sacred games fame rajshri deshpande set up a school for sugarcane workers children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.