/>भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याचा बायोपिक ‘अझहर’ रिलीजच्या वाटेवर असताना आता ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याच्या चाहत्यांसाठीही आनंदाची बाब आहे. सचिनच्या आयुष्यावरही लवकरच चित्रपट येतो आहे. विशेष म्हणजे सचिन यात अभिनयही करणार आहे. Sachin: A Billion Dreams असे त्याचे नाव. आज खुद्द सचिननेच या चित्रपटाचे पहिले टीजर पोस्टर रिलिज केले. या चित्रपटाद्वारे सचिन अभिनयक्षेत्रातही पर्दापण करतो आहे. ब्रिटीश डायरेक्टर जेम्स एर्स्क्राइन हे हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. आपल्या बॅट व पॅडसह सचिन फिल्डवर उतरतो आहे, असे या पोस्टरमध्ये दिसते आहे."55 Days of training. One pair of trousers. The Sachin story," असे कॅप्शन त्याखाली लिहिलेले आहे. येत्या १४ एप्रिलला या चित्रपटाचा टीजर रिलिज होणार आहे. चित्रपटाचा फस्ट लूक जारी करताना सचिन निश्चितच आनंदी होता. आपला हा आनंद त्याने चाहत्यांशी शेअरही केला. गेली अनेक वर्षे मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार, असे त्याने लिहिलेयं. शिवाय १४ एप्रिलला दुपारी १ वाजता चित्रपटाचा टिजर बघण्याची गळही घातली आहे.
Web Title: Sachin: A Billion Dreams Biopic on Sachin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.