​तैमुरबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर का भडकला सैफ अली खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:18 IST2017-10-02T08:48:26+5:302017-10-02T14:18:26+5:30

सैफ अली खान सध्या शेफ या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस ...

Saam Ali Khan Khan, a journalist questioned about Tamimur? | ​तैमुरबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर का भडकला सैफ अली खान?

​तैमुरबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर का भडकला सैफ अली खान?

फ अली खान सध्या शेफ या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सैफ सध्या त्याच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यात चांगलाच खूश आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन झाले. तैमुरच्या जन्मानंतर त्याचे आणि करिनाचे आयुष्य आता तैमुरच्याच अवतीभवती फिरत आहे. ते दोघेही चित्रीकरणातून वेळ काढून सध्या जास्तीत जास्त वैळ तैमुरसोबत घालवतात. अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण करिना आणि सैफने तैमुरला नेहमीच कॅमेऱ्याच्या समोर आणले आहे. एवढेच नव्हे तर करिना अनेक वेळा तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवरून त्याचे फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तो आता सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. एवढ्या लहान वयात तो सेलिब्रिटी बनला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.  
करिनाला सध्या तिच्या प्रत्येक मुलाखतीत तैमुरविषयी प्रश्न विचारले जात आहेत आणि ती देखील त्या प्रश्नांना हसत खेळत उत्तरं देत आहे. पण तैमुरबाबत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नामुळे सैफ नुकताच चांगलाच भडकला. शेफ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने सैफला विचारले की, शेफ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस तू तैमुरला मिस केले का? या प्रश्नावर सैफ भडकेल अशी कोणालाच कल्पना नव्हती. पण सैफ चांगलाच चिडला आणि म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का माझा मुलगा हा केवळ नऊ महिन्याचा आहे आणि या चित्रपटात माझ्यासोबत जो बालकलाकार आहे तो १३ वर्षांचा आहे आणि त्यातही दुसऱ्या कोणाच्याही मुलात मी तैमुरला पाहात नाही. तैमुरला मी नेहमीच मिस करतो. तो माझा मुलगा आहे आणि हे माझ्या नेहमीच लक्षात असते. त्यामुळे तुम्ही मला असा प्रश्न का विचारत आहात? तुम्हाला मुले नाहीत का? सैफने या प्रश्नाचे अशाप्रकारे उत्तर देत सगळ्यांचीच बोलती बंद केली. 

Also Read : ​सारा अली खानमुळे का उडाली सैफ अली खानची रात्रीची झोप..वाचा सविस्तर

Web Title: Saam Ali Khan Khan, a journalist questioned about Tamimur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.