Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:54 PM2022-04-27T13:54:31+5:302022-04-27T13:57:13+5:30

Runway 34 Celebes Review: रितेश देशमुख, जेनेलिया, जॅकी भगनानी, कपिल शर्मा यांनी अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा सिनेमा पाहिलायं आणि त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

Runway 34 MOVIE Celebes Review riteish deshmukh gave a big hug to ajay devgn | Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

googlenewsNext

Runway 34 Celebes Review: अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘रनवे 34’ (Runway 34) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहांत धडकणार आहे. अजय, अमिताभ बच्चन, रकुलप्रीत सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. 2015 साली खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असताना पायलटने जोखित पत्करत हे विमान विमानतळावर उतरवलं होतं. अशा लँडिंगला ब्लाइंड लँडिंग म्हणतात. या लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. तूर्तास या चित्रपटाचा सेलिब्रिटी रिव्ह्यू समोर आला आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) , जेनेलिया, जॅकी भगनानी, कपिल शर्मा यांनी हा सिनेमा पाहिलायं आणि त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

कपिल शर्मा म्हणाला, ब्रिलिएंट, फुल ऑफ थ्रील...

कपिल शर्माने अजयच्या ‘रनवे 34’चं मनापासून कौतुक केलं आहे. ब्युटिफुल, ब्रिलिएंट, फुल ऑफ थ्रील... सर्व कलाकारांनी शानदार काम केलंय.. काय सुंदर चित्रपट आहे, असं ट्विट कपिल शर्माने केलं आहे. शिवाय पाजी अर्थात अजय देवगणला शुभेच्छाही दिल्या आहेत.

रितेशने अजयला मारली मिठी...

‘रनवे 34’ पाहून अभिनेता रितेश देशमुख इतका गदगद झाला की, त्याने अजयला कडकडून मिठी मारली. अजयसोबतचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, ‘काल रात्री मनाला स्पर्श करणारा एरिअल थ्रीलर कोर्ट रूम ड्रामा रनवे 34 बघितला. माझा मित्र आणि भाऊ अजय देवगणला एक मोठ्ठी झप्पी. तू काय काम केलं आहेस, मला तुझा अभिमान आहे. फ्लाइटच्या लँडिंग सीक्वेन्सने मला आरपार हलवून सोडलं. हा अभिनेता आणि दिग्दर्शक बॉम्ब आहे,’असं त्याने म्हटलं आहे. रकुलप्रीत सिंगचं सुद्धा त्याने कौतुक केलं आहे.

जेनेलिया रकुलवर फिदा
जेनेलिया डिसुजा हिने अजय व रकुल यांचा फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. ‘डिअर रकुल प्रीत, मी तुला सांगू इच्छिते की, तू रनवे 34 मध्ये जबरदस्त काम केलं आहेस. माझ्या शुभेच्छा,’असं जेनेलियानं लिहिलं आहे.

जॅकी भगनानीही प्रेमात...

जॅकी भगनानी हा सुद्धा ‘रनवे 34’ या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. ‘रनवे 34’ हा मी अलीकडे बघितलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तुम्हाला पूर्णवेळ खिळवून ठेवतो. अजय देवगणचं दिग्दर्शन जबरदस्त आहे. सर्व कलाकारांचा अभिनयही तितकाच जबरदस्त आहे. रकुल तुझा मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्याने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Web Title: Runway 34 MOVIE Celebes Review riteish deshmukh gave a big hug to ajay devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.