​रस्त्यांवरच्या पोरांसोबत रमला सल्लूमियाँ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 07:31 IST2016-03-03T14:30:25+5:302016-03-03T07:31:17+5:30

सलमान खान हे कितीही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असले तरी त्याचा दानशूरपणा लपून राहिलेला नाही. काल बुधवारी रात्रीही त्याच्या याच दानशूरपणाचा परिचय ...

Rumla Salloomies with the nights on the streets | ​रस्त्यांवरच्या पोरांसोबत रमला सल्लूमियाँ

​रस्त्यांवरच्या पोरांसोबत रमला सल्लूमियाँ

मान खान हे कितीही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असले तरी त्याचा दानशूरपणा लपून राहिलेला नाही. काल बुधवारी रात्रीही त्याच्या याच दानशूरपणाचा परिचय आला. बुधवारची रात्र सलमानने बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मासोबत घालवली. हे तिघेही मुंबईच्या एका पॉश हॉटेलात जेवायला गेले. डिनर एन्जॉय केल्यानंतर रात्री उशीरा सलमान हॉटेलबाहेर  पडला. याचदरम्यान रस्त्यावर काही गरिब मुले ङुगे आणि पुस्तके विकत असल्याचे त्याला दिसले. मग काय, सलमानच्याने राहावले नाही. तो थेट या पोरांमध्ये जावून मिसळला. त्याने त्यांच्याकडून जमेल तेवढे फुगे व पुस्तके खरेदी केलीत. त्यांना पैशाचा खाऊही दिला. शिवाय या पोरांना प्रेमाने जवळही घेतले. या पोरांशी गप्पा मारताना सल्लू अगदी रमून गेल्याचे रस्त्यावरच्या वाटेकरूंनी पाहिले.

Web Title: Rumla Salloomies with the nights on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.