​ ‘डर्टी डान्स’वर क्रितीने दिले असे तिखट उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:38 IST2016-12-22T14:38:37+5:302016-12-22T14:38:37+5:30

डिझाईनर मनीष मल्होत्रा याने त्याच्या वाढदिवसाची पार्टी देऊन खरे तर उणापुरा महिना उलटला. पण अजूनही त्याची ही पार्टी चर्चेत ...

Rubbish answer given on 'Dirty Dance'! | ​ ‘डर्टी डान्स’वर क्रितीने दिले असे तिखट उत्तर!!

​ ‘डर्टी डान्स’वर क्रितीने दिले असे तिखट उत्तर!!

झाईनर मनीष मल्होत्रा याने त्याच्या वाढदिवसाची पार्टी देऊन खरे तर उणापुरा महिना उलटला. पण अजूनही त्याची ही पार्टी चर्चेत आहे. या पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या व्हिडिओत असे काय होते, असे तुम्ही विचाराल तर त्यात होता, सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनॉन या दोघांचा ‘डर्टी डान्स’. होय, सुशांत आणि क्रितीच्या या ‘डर्टी डान्स’ची चांगलीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, इतकी चर्चा होऊनही क्रिती आणि सुशांत दोघांनीही त्यावर मौन बाळगले होते. पण आता कसे कुणास ठाऊक क्रितीने आपले मौन तोडत या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे.

अलीकडे एका मुलाखतीत क्रितीला या व्हिडिओबद्दल विचारण्यात आले. यावर क्रितीने चांगलेच तिखट उत्तर दिले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो व्हिडिओ जरा लक्षपूर्वक बघा. मी या व्हिडिओत सुशांतच्या कानात काहीतरी सांगताना दिसते आहे. आता याला तुम्ही  ‘डर्टी डान्स’ म्हणत असाल तर  ‘डर्टी डान्स’ची तुमची व्याख्या एकदम चुकीची आहे, असे क्रिती म्हणाली. 
सध्या मीडियात सुशांत आणि क्रितीच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. ‘राबता’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि नंतर हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले. याचदरम्यान अंकिता लोखंडेसोबत सुशांतचे ब्रेकअप झाल्याने तर क्रिती व सुशांतच्या अफेअरच्या बातम्यांनी आणखीच जोर धरला. क्रिती व सुशांत मात्र आमच्यात तसले काहीही नसल्याचे वेळोवेळी सांगत आहेत. आता त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Web Title: Rubbish answer given on 'Dirty Dance'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.