रुपाची खाण...ऐश्वर्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 20:04 IST2016-04-26T14:34:49+5:302016-04-26T20:04:49+5:30

बॉलिवूडमध्ये सौंदर्याचे खरे मानक म्हणजे ऐश्वर्या. या वयातही तिचे रुप चंदेरी पडद्यावरून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 1994 साली ...

Roopchi mine ... Aishwarya | रुपाची खाण...ऐश्वर्या

रुपाची खाण...ऐश्वर्या

लिवूडमध्ये सौंदर्याचे खरे मानक म्हणजे ऐश्वर्या. या वयातही तिचे रुप चंदेरी पडद्यावरून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

1994 साली मिस वर्ल्ड ठरलेल्या ऐश्वर्याने देखण्या रुपाबरोबरच आपल्या अभिनय कौशल्याने न केवळ हिंदी तर आंतरराष्ट्रीय सिनेमांतही नाव कमावले आहे. 

कान्स चित्रपट महोत्ववातील रेड कार्पेटवर तिची आवर्जून असते. अनेक वर्षे भारतीय चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून ऐश्वर्या रायचे नाव घेतले जाई. 

अभिषेक बच्चनशी लग्न झाल्यावरदेखील ऐश्वर्याने करिअरमध्ये खंड पडू दिला नाही. मध्यंतरी मुलीला जन्म दिल्यानंतर तिने काही वर्षे बे्रक घेतला होता. जज्बा चित्रपटातून तिने पुनरागमन केले आणि आता ‘सरबजीत’ य चित्रपटातून ऐश्वर्या पूर्णपणे डिग्लॅम लूकमध्ये दिसणार आहे.

Aishwarya

तत्पूर्वी एका सौंदर्यप्रसाधन ब्रँडच्या कार्यक्रमात ऐश्वर्याने हजेरी लावली. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेहºयावर उजळणारे हास्य पाहून कोणीही म्हणेल की, वय तर केवळ आकडा असतो. 

Aishwarya Rai

तिची अशी मनमोक अदा पाहून कोणीही ऐश्वर्याच्या प्रेमात पडेल. ऐश वुई लव्ह यू...

Web Title: Roopchi mine ... Aishwarya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.