​बिपाशाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करणने दिले तिला हे रोमँटिक गिफ्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:47 IST2016-12-18T14:17:12+5:302016-12-19T10:47:30+5:30

अभिनेता करणसिंह ग्रोवर सध्या भलत्याच रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. होय, इतका की, पत्नी बिपाशा बसू हिच्यासाठी त्याने एक रोमॅन्टिक गाणे ...

This romantic gift given to her in love with Bipasha ... | ​बिपाशाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करणने दिले तिला हे रोमँटिक गिफ्ट...

​बिपाशाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करणने दिले तिला हे रोमँटिक गिफ्ट...

िनेता करणसिंह ग्रोवर सध्या भलत्याच रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. होय, इतका की, पत्नी बिपाशा बसू हिच्यासाठी त्याने एक रोमॅन्टिक गाणे लिहिले आहे. ‘राईट अ‍ॅज रेन’ असे या गाण्याचे बोल आहेत. याचवर्षी ३० एप्रिलला करण आणि बिपाशा लग्नबंधनात अडकले होते. करण याबद्दल सांगतो,  ‘मी बिपाशासाठी ‘राईट अ‍ॅज रेन’हे गाणे लिहिले आहे. हे गाणे आमच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमावर लिहिलेले आहे.’

 करणला गाण्याचे प्रचंड वेड आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या सेटवर तो अनेकदा गाणी गुणगुणत असतो. आता करण आपला हा छंद पुढे नेऊ इच्छित आहे. केवळ इतकेच नाही तर संगीत क्षेत्रात नवी झेप घेऊ पाहतो आहे.  करण लवकरच एका इंटरनॅशनल म्युझिक बँडसोबत परफॉर्मन्स देणार आहे.  तूर्तास करण संगीताचे धडे घेतोय. ‘डायनासोर पिल अप’सोबत परफॉर्म करण्याची संधी माझ्यासाठी मोठी संधी आहे. हा एक रोचक अनुभव असेल. संगीत क्षेत्रात मी काही करू शकतो, अशी आशा मला यामुळे वाटू लागली आहे.

मला रॉक म्युझिक आवडतं आणि ‘डायनासोर पिल अप’ बँड त्याच्या रॉक नंबर्ससाठी ओळखला जातो. या बँडसोबत काम करण्याचा अनुभव घेण्यास मी प्रचंड उत्सूक आहे,असे करण म्हणाला. आता करण इतका उत्सूक आहे म्हटल्यावर त्याचा परफॉर्मन्स जबरदस्तच होणार. शिवाय आता तो गीतकारही झाला आहे. बिपाशासाठी  गाणे लिहिलेय, म्हटल्यावर करण चांगलाच जोरात आहे, म्हणायचे. बिप्स यामुळे जाम आनंदात असणार, हे वेगळे सांगायला नकोच.

Web Title: This romantic gift given to her in love with Bipasha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.