‘फन्ने खान’मध्ये साउथचा ‘हा’ सुपरस्टार करणार ऐश्वर्या रायसोबत रोमान्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 21:12 IST2017-08-20T15:42:12+5:302017-08-20T21:12:12+5:30

काही दिवसांपूर्वीच आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अनिल कपूर यांच्या नावाची निर्मात्यांनी घोषणा केली. त्याचबरोबर ...

Romance with Aishwarya Rai to make South's 'Ha' superstar in 'Fannie Khan' | ‘फन्ने खान’मध्ये साउथचा ‘हा’ सुपरस्टार करणार ऐश्वर्या रायसोबत रोमान्स !

‘फन्ने खान’मध्ये साउथचा ‘हा’ सुपरस्टार करणार ऐश्वर्या रायसोबत रोमान्स !

ही दिवसांपूर्वीच आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अनिल कपूर यांच्या नावाची निर्मात्यांनी घोषणा केली. त्याचबरोबर हे दोघे चित्रपटात रोमान्स करणार नसल्याचेही स्पष्ट केले गेले. त्यामुळे ऐश कोणाबरोबर रोमान्स करणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. अखेर याचा उलगडा झाला असून, साउथ सुपरस्टारने या भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती समोर येत आहे. हा सुपरस्टार दुसरा-तिसरा कोणीही नसून, ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेला आर. माधवन आहे. 

आर. माधवन या चित्रपटात ऐश्वर्यासोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने एका मुलाखतीत म्हटले की, ऐशसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. मात्र ती माझ्या अपोझिट नसल्याचे दु:ख होत आहे. या चित्रपटात आमच्या दोघांचे बरेचसे सीन्स आहेत. मात्र दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रेम दाखविण्यात येणार नाही.’ असेही अनिल कपूरने स्पष्ट केले होते. 



दरम्यान, आर. माधवनच्या अगोदर राजकुमार राव, विक्की कौशल तसेच अक्षय ओबेरॉय यांची नावे समोर आली होती. अक्षयचे नाव तर कन्फर्मही झाले होते. परंतु तो विवेक ओबेरॉयचा कजिन असल्याने त्याने ऐश्वर्यासोबत काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. एकेकाळी ऐश्वर्या आणि विवेक यांच्यात अफेअर होते. मात्र काही कारणामुळे हे अफेअर तुटले अन् ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याबरोबर विवाह केला. त्याच कारणामुळे अक्षय ओबेरॉयने ऐशसोबत काम करण्यास नकार दिला होता. 

असो, आता ही भूमिका आर. माधवन याला मिळाली असून, ऐश आणि माधवनची फ्रेश जोडी प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीला प्रेक्षक कितपत पसंत करतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच. गेल्यावर्षी ऐश्वर्या राय-बच्चन ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रणबीर कपूरसोबतचा ऐशचा रोमान्स त्याकाळी चांगलाच चर्चेत राहिला होता, तर आर. माधवन हा ‘खडूस’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर करिष्मा दाखविण्यात सपशेल अपयशी ठरला. 

Web Title: Romance with Aishwarya Rai to make South's 'Ha' superstar in 'Fannie Khan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.