रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 01:11 PM2023-07-24T13:11:57+5:302023-07-24T13:13:49+5:30

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र चित्रपटाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे.

Rocky aur rani kii prem kahaani alia bhatt and ranveer singh film recovers 90 percent of its budget before release | रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई

रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई

googlenewsNext

बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपट सध्या चर्चेत आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी 28 जुलैला रिलीज होणार आहे. आलिया भट आणि रणवीर सिंग त्यांच्या चित्रपटाचे प्रमोकन करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 160 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. आलिया भट आणि रणवीर सिंगच्या या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 160 कोटींची कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्समधून पैसे आले आहेत. 

काय आहे सिनेमाची कथा?
चित्रपटाची कथा रॉकी म्हणजेच रणवीर सिंग आणि राणी म्हणजेच आलिया भट यांची आहे. दोघेही प्रेम करतात. पण दोघांचे कुटुंब पूर्णपणे वेगळे आहे. राणी बंगाली कुटुंबातील आहे तर रॉकी पंजाबी कुटुंबातील आहे. आता दोन्ही कुटुंब पेच प्रसंगात अडकतात, मग दोघेही एकमेकांच्या कुटुंबासोबत तीन महिने राहायला तयार होतात. या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र आणि आमिर बशीरसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 
 

Web Title: Rocky aur rani kii prem kahaani alia bhatt and ranveer singh film recovers 90 percent of its budget before release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.