हळूहळू पूर्ववत होतंय रिया चक्रवर्तीचं आयुष्य, वर्कआउटनंतर दिसली भाऊ शौविकसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 17:28 IST2021-02-19T17:27:56+5:302021-02-19T17:28:23+5:30
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे.

हळूहळू पूर्ववत होतंय रिया चक्रवर्तीचं आयुष्य, वर्कआउटनंतर दिसली भाऊ शौविकसोबत
बॉलिवू़ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप चर्चेत येत असते. नुकतीच ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. रिया चक्रवर्तीला पाहून नेहमी प्रमाणे फोटोग्राफर्सने फोटो घेण्यासाठी पुढे आले. या दरम्यान फोटोग्राफर्सने तिची चौकशी केली. थोड्या वेळाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ त्यांच्या गाडीत बसून तिथून निघून गेले. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे.
मागील वर्षी रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरूंगाची हवा खावी लागली होती. मात्र हळूहळू तिचे जीवन पूर्ववत होत आहे. रिया चक्रवर्तीचा हा व्हिडीओ वुम्पलाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यापूर्वीही तिचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रिया चक्रवर्तीचा मित्र रुमी जाफरीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, यावर्षी बॉलिवूडच्या जगतात ती कमबॅक करू शकते. रिया चक्रवर्ती २०२१ मध्ये चेहरे सिनेमातून कमबॅक करू शकते.
मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाकडून रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मात्र तिला ड्रग्स प्रकरणात तिला एक महिना तुरूंगात रहावे लागले होते.