रितेशने ४० फुट उंचावर वाजविला ‘बॅन्जो’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 13:23 IST2016-08-24T07:49:21+5:302016-08-24T13:23:27+5:30
‘बॅँजो’ चित्रपटात रितेश देशमुख स्ट्रीट म्यूझिशियनची भूमिका करतोय. यासाठी त्याने खूप रिस्कही घेतल्याचे दिसते. या चित्रपटातील एका गणेश चतुर्थीच्या ...
.jpg)
रितेशने ४० फुट उंचावर वाजविला ‘बॅन्जो’
जेव्हा रवी जाधवन यांनी रितेशला ४० फूट उंचीवर चढून बँजो वाजवायला सांगितले तेव्हा रितेश कोणतीही तक्रार न करता वर चढला. हे गणपतीचे गाणे असल्यामुळे रितेशही उत्साहात होता. हे गाणे आकर्षक बनवण्यासाठी काहीही करायला तो तयार होता.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी 'नटरंग', 'बालक बालक', 'टाईमपास' यासारखे हिट मराठी चित्रपट बनवले आहेत.'बँजो' चित्रपटातून रवी जाधव बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. 'बँजो' २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.