रितेश देशमुख पुन्हा साकारणार खलनायक! 'Raid 2'मध्ये अजय देवगणला देणार टफ फाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:58 AM2024-01-12T11:58:47+5:302024-01-12T11:59:12+5:30

'Raid 2' मध्ये रितेश देशमुखची एन्ट्री! पुन्हा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

ritesh deshmukh to play negative role in ajay devgn raid 2 | रितेश देशमुख पुन्हा साकारणार खलनायक! 'Raid 2'मध्ये अजय देवगणला देणार टफ फाईट

रितेश देशमुख पुन्हा साकारणार खलनायक! 'Raid 2'मध्ये अजय देवगणला देणार टफ फाईट

'डंकी', 'टायगर ३' या सिनेमानंतर आता अजय देवगणच्या 'Raid 2' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'Raid' या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. 'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या सिनेमात आता डॅशिंग अभिनेता रितेश देशमुखची एन्ट्री झाली आहे. 

'Raid 2'मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक पाठकने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "रितेश देशमुख विरोधकाच्या भूमिकेने 'Raid 2'मधील सूत्र हलवणार", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच 'Raid 2'च्या निमित्ताने रितेश आणि अजय देवगण आमनेसामने दिसणार आहेत. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

अजय देवगणच्या 'Raid 2'च्या चित्रीकरणाचा दाक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजाच्या हातून करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'Raid 2'मध्ये अजयबरोबरच रवी तेजाही दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, याबाबत अद्याप कोणतीही माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. त्यानंतर 'Raid 2'मध्ये वाणी कपूरची वर्णी लागली होती. आता 'Raid 2'मध्ये रितेशची एन्ट्री झाल्याने चाहत्यांची या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

दरम्यान, रितेशने याआधीही काही सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'एक व्हिलन' आणि 'मरजावा' या चित्रपटांत रितेश निगेटिव्ह रोलमध्ये दिसला होता. त्याच्या या भूमिकांनाही चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. आता पुन्हा एकदा रितेश खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Web Title: ritesh deshmukh to play negative role in ajay devgn raid 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.