रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियासोबतचा हा क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 18:40 IST2017-02-03T13:07:52+5:302017-02-03T18:40:16+5:30

बॉलिवूडमधील सर्वांत प्रेमळ कपल्सपैकी एक कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख हे होय. एकीकडे घटस्फोट अन् वादाच्या घटना कानावर ...

Riteish Deshmukh shared this photo with Jenelia | रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियासोबतचा हा क्युट फोटो

रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियासोबतचा हा क्युट फोटो

लिवूडमधील सर्वांत प्रेमळ कपल्सपैकी एक कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख हे होय. एकीकडे घटस्फोट अन् वादाच्या घटना कानावर पडत असतानाच या दोघांमधील प्रेम अन् संसाराचे नाते बहरताना दिसत आहे. यांच्या लग्नाला ३ फेब्रुवारी रोजी पाच वर्षे पूर्ण झाले असून, त्यानिमित्त रितेशने जेनेलियासाठी एक खास फोटो शेअर केला आहे. 

‘तुझे मेरी कसम, मस्ती आणि तेरे नाल प्यार हो गया’ या सिनेमांमध्ये स्क्रीन शेअर करणारी हे जोडी कधी एकमेकांच्या प्रेमात पडली अन् पुढे लग्नाच्या बंधनात अडकली याची फारसी भनकच लागली नाही. बघता बघता या दोघांनी संसाराचे पाच वर्ष पूर्ण केले. दोघेही एकमेकांसोबत प्रचंड खूश असून, जणू काही दिवसागणिक त्यांच्यातील प्रेमसंबंध बहरतच आहे. या जोडप्याला दोन मुले असून, या दोघांनी बॉलिवूडमधील इतर कपल्ससमोर स्वत:चा आदर्श निर्माण केला आहे. 
 खरं तर रितेश आणि जेनेलिया यांची प्रेम करण्याची तºहा काही औरच आहे, कधी लंच, तर कधी डिनर डेटवर हे जोडपे बघावयास मिळाले आहेत. सोशल मीडियावर तर एकमेकांचे कौतुकही ते अतिशय हटके पद्धतीने करताना बघावयास मिळाले. शुक्रवारी रितेशने ट्विटरवर अशाच हटके पद्धतीने एक फोटो शेअर करून जेनेलियाला त्यांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत.  फोटोमध्ये नवरीच्या वेशात नटलेल्या जेनेलियाकडे रितेश कुतुहलाने बघताना दिसत आहे. जेनेलियादेखील त्याला स्माइल देत आहे. 

रितेशने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी तुझ्याकडे बघतो अन् स्वत:ला भक्कम समजतो, भाग्यवान समजतो, लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा... बायको!’ रितेशचा हा हटके अंदाज जेनेलियाला भावला नसेल तरच नवल. असो या दोघांच्या सुखी संसारात आणखी आनंदाचे क्षण येवोत, हीच ‘सीएनएक्स मस्ती’कडून शुभेच्छा!

Web Title: Riteish Deshmukh shared this photo with Jenelia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.