रितेश देशमुखचा 'मस्ती ४' की फरहान अख्तरचा '१२० बहादुर'; कोणी मारली मंडे टेस्टमध्ये बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:20 IST2025-11-25T16:18:27+5:302025-11-25T16:20:20+5:30
मस्ती ४ आणि १२० बहादुर हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज आले. जाणून घ्या या दोन्ही सिनेमांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट कसा आहे

रितेश देशमुखचा 'मस्ती ४' की फरहान अख्तरचा '१२० बहादुर'; कोणी मारली मंडे टेस्टमध्ये बाजी?
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी बॉलिवूडमध्ये दोन सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी एक म्हणजे 'मस्ती ४' आणि दुसरा म्हणजे '१२० बहादुर'. दोन्ही सिनेमांचे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. एका सिनेमाचा विषय अॅडल्ट कॉमेडी आहे तर दुसऱ्या सिनेमाचा विषय देशभक्तीवर आधारीत आहे. या दोन्ही सिनेमांपैकी मंडे टेस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने बाजी मारली. जाणून घ्या
मस्ती ४ की १२० बहादुर? बॉक्स ऑफिसची कमाईमध्ये कोण ठरलं श्रेष्ठ
फरहान अख्तरची दमदार अदाकारी असलेला '१२० बहादुर' सिनेमा चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या सिनेमाची सुरुवात संथ असली तरीही वीकेंडला '१२० बहादुर'
सिनेमाला चांगलाच फायदा झालेला पाहायला मिळतोय. सोमवारी या सिनेमाने १.४० कोटींची कमाई केली. त्यामुळे चार दिवसांचं टोटल कलेक्शन बघता '१२० बहादुर'
सिनेमाने ११.५० कोटींची कमाई केली आहे.
दुसरीकडे 'मस्ती ४'बद्दल सांगायचं तर, हा सिनेमा आधीच्या तीन सिनेमांप्रमाणे अपेक्षित यश मिळवू शकला नाही. पहिल्या दिवशी २.७५ कोटी कमाई करणाऱ्या सिनेमाने रविवारी तीन कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय सोमवारी या सिनेमाने १.५० कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे 'मस्ती ४'चं एकूण कलेक्शन १० कोटी इतकं झालं आहे. त्यामुळे 'मस्ती ४' मंडे टेस्टमध्ये पास झाला असला तरी कमाईच्या बाबतीत मात्र '१२० बहादुर'च्या मागेच आहे. एकूणच या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवता आले नाही.