Riteish Deshmukh : 'पत्नी जास्त कटकट करत असेल तर...',रितेशचा विवाहित पुरुषांसाठी मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 15:12 IST2023-05-05T15:12:03+5:302023-05-05T15:12:30+5:30
Riteish Deshmukh : रितेशने विवाहित पुरुषांना सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सांगितला आहे. मात्र त्यात एक मजेशीर ट्विस्ट आहे.

Riteish Deshmukh : 'पत्नी जास्त कटकट करत असेल तर...',रितेशचा विवाहित पुरुषांसाठी मोलाचा सल्ला
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा वेड (Ved Marathi Movie) चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातून जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर रितेश देशमुखने ‘वेड’चं दिग्दर्शन केलं होतं. रितेश आणि जिनिलिया दोघे सोशल मीडियावर सक्रीय आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांचे रिल्स चाहत्यांना खूप पसंतीस येतात. रितेश देशमुखने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या व्हिडीओतून रितेशने विवाहित पुरुषांना सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सांगितला आहे. मात्र त्यात एक मजेशीर ट्विस्ट आहे.
या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख म्हणाला की, जर तुमची बायको फार कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि ती पायात घालून सरळ बाहेर निघून जा. त्यापलीकडे जास्त काहीच विचार करू नका. अन्यथा नको ते होऊन बसेल. त्याच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले की, ३६ गुणांपैकी ३५ गुण हे नवरीकडे असतात. नवऱ्याकडे एकच गुण असतो ते म्हणजे गप्प राहणं, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, डरपोक माणूस. आणखी एकाने लिहिले की, पत्नीची भीती.
रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी २००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रितेश आणि जिनिलियाची भेट झाली होती. काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांचे लग्न झाले. त्या दोघांना दोन मुले आहेत. एकाचं नाव आहे रायन आणि दुसऱ्याचं राहील.