दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:25 IST2025-10-22T16:24:34+5:302025-10-22T16:25:19+5:30
"तू आमच्यासाठीच काम करत आहेस आम्हाला माहितीये पण...", चिमुकल्यांचं बाबासाठी पत्र

दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजे रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख. सण असो, इव्हेंट असो किंवा त्यांचा एखादा सिनेमा येणार असो दरवेळी देशमुख कुटुंब लक्ष वेधून घेतं. सणासुदीला देशमुख कुटुंबात अगदी पारंपरिक रितींप्रमाणे सगळं साजरं होतं. जिनिलिया अनेक नवरा आणि मुलांसोबतचे व्हिडीओ शेअर करत असते. यंदा मात्र दिवाळीला शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने रितेश देशमुख त्याच्या कुटुंबाजवळ नव्हता. त्याच्या गैरहजेरीत दोन्ही मुलांनी त्याच्यासाठी एक मेसेज लिहिला.
रितेश-जिनिलियाचा मुलगा रियान लिहितो, 'हाय बाबा, हॅपी दिवाळी. सिनेमाच्या सेटवर तुझं सगळं चांगलं सुरु आहे अशी आशा करतो. आज दिवाळीला आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे. पण आम्हाला माहितीये तू तुला जे आवडतं ते काम करत आहेस. तुझा सिनेमा 'राजा शिवाजी' ला खूप यश मिळो."
तर दुसरा मुलगा राहील लिहितो, "हाय बाबा, आम्हाला माहितीये की तू आमच्यासाठीच काम करत आहे. आज दिवाळी आहे आणि सणाचा हा प्रकाश तुझ्यापर्यंतही पोहोचू दे. तुझ्याशिवाय आजचं दिवाळी लंच अपूर्णच आहे. तुझं शूटिंग छान पार पडू दे."
मुलांचं हे पत्र वाचून रितेशही भावुक झाला. त्याने लिहिले, "और जीने को क्या चाहिये! राजा शिवाजीचं शूट सुरु आहे ही खास गोष्ट आहेच पण मुलांकडून हे पत्र मिळणं याचा आनंद न संपणारा आहे".
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. सेटवरील त्याचे काही लूकही व्हायरल झाले होते. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.