जेनेलिया-रितेशच्या रोमान्समध्ये 'तिसरा' आला, अन्...; हा धम्माल व्हिडीओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:53 IST2021-07-09T14:51:44+5:302021-07-09T14:53:34+5:30
Genelia-Riteish Romantic Funny Video : जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांत 6 लाखांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

जेनेलिया-रितेशच्या रोमान्समध्ये 'तिसरा' आला, अन्...; हा धम्माल व्हिडीओ एकदा पाहाच
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) हे बॉलिवूडचे क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. इतकेच काय, आणखी असे व्हिडीओ बनवा, म्हणून लोक या जोडप्याकडे मागणी करतात. सध्या रितेश व जेनेलियाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला दाद द्यावीशी वाटेल.
होय, जेनेलियाने हा मजेशीर व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. जेनेलिया व रितेश दोघेही एकमेकांत हरवलेत. वातावरण रोमॅन्टिक आहे. पण रोमान्स सुरू होणार, तेवढ्यात तिसरा येतो अन् रोमान्सचा पार विचका करतो. हा तिसरा कोण तर जेनेलिया व रितेशचा डॉगी. डॉगी दोघांच्याही गालाला चाटू लागतो. रोमान्स सुरू असताना कुत्रामध्ये आल्यावर जेनेलियाला हसू आवरत नाही. रितेशच्या चेह-यावरचे भाव बघून तर तिला आणखीच हसू कोसळतं. बिच्चारा रितेश मग जेनेलियाला सोडून डॉगीलाच जवळ घेतो.
जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. उण्यापु-या 18 तासांत 6 लाखांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. कमेंट्स तर विचारू नका. कित्ती गोड, हे कपल इतके क्यूट का आहे अशा कमेंट्सचा जणू पूर आला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलिया या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले.
जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.