देशमुखांचा गुढीपाडवा! रितेश देशमुखनं मुलांसह उभारली गुढी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 01:03 PM2024-04-09T13:03:32+5:302024-04-09T13:05:04+5:30

गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Celebrate Gudi Padwa With Family Video Viral | देशमुखांचा गुढीपाडवा! रितेश देशमुखनं मुलांसह उभारली गुढी, पाहा व्हिडीओ

देशमुखांचा गुढीपाडवा! रितेश देशमुखनं मुलांसह उभारली गुढी, पाहा व्हिडीओ

गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. आज सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. मराठी सेलिब्रिटीही गुढीपाडवा साजरा करत आहेत. महाराष्ट्राचं लाडकं कुटुंब असलेल्या देशमुखांच्या घरी सगळे सण जोमात साजरे केले जातात. आज देशमुखांच्या घरी गुढी उभारली असून याची एक झलक समोर आली आहे. 

रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुखनं इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यातून तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओत रितेश आपली मुलं रिआन व राहिलसह गुढी उभारताना दिसत आहे. जिनिलीयाने कॅप्शनमध्ये लिहलं, 'पहाटे आमची गुढी तयार होतं आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा'.  हा व्हिडीओ शेअर करताना जेनेलिया देशमुखने सर्वांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. 

यासोबतच जेनेलियानं रितेशबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिनं पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तिनं लिहलं, 'गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा …तुमच्या कुटुंबाला आनंद आणि समृद्धी लाभो'. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडमधलं एक आयडिअल कपल आहे. दोघंही आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी ते आपल्या कुटुंबाला वेळ देतातच.

रितेश आणि जिनिलीयाच्या  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  फ्रेबुवारीमध्ये 'राजा शिवाजी'  या चित्रपटाची रितेशने घोषणा केली. रितेश देशमुख या सिनेमाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जिनिलीया सांभाळणार आहे. २०२५ला हा चित्रपट मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक कथेमधे बलाढ्य शक्तींविरुद्ध बंड करत स्वराज्य स्थापन करणारा असा असाधारण वीर योद्धा ते आदरणीय ‘राजा शिवाजी‘ यांचा अचंबित करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे. 
 

Web Title: Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Celebrate Gudi Padwa With Family Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.