रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:22 IST2017-10-04T08:52:34+5:302017-10-04T14:22:34+5:30

उदय चोप्राला दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१३ मध्ये उदय स्क्रिनवर अखेरचा दिसला होता. पण म्हणून उदय चोप्राला इतक्या सहज ...

Ripped body, missing toned masals, increased weight !! Do you know 'Uday Chopra'? | रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता?

रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब, वाढले वजन!! ‘या’ उदय चोप्राला तुम्ही ओळखता?

य चोप्राला दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१३ मध्ये उदय स्क्रिनवर अखेरचा दिसला होता. पण म्हणून उदय चोप्राला इतक्या सहज विसरता येणे शक्य नाही.उदय चोप्रा आठवला की, ‘मोहब्बतें’ आठवतो. उदय चोप्रा हे नाव आले की,‘धूम’ सीरिज आठवते.  रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स अशा हँडसम लूकमधला ‘धूम’मध्ये उदयने साकारलेला अली सगळ्यांना भावला होता. पण अलीकडे उदयचा ताल जरा बिघडलाय. होय, बिघडलायं, असेच म्हणता येईल. आम्ही असे का बोलतोय, हे उदयचे ताजे फोटो पाहिल्यावर तुमच्याही लक्षात येईल.



काल-परवा उदय इमरान हाश्मीच्या घराबाहेर दिसला. त्याचा तो अवतार पाहून उदय तो हाच का ?, असाच प्रश्न सर्वांना पडला. होय, या फोटोंमध्ये उदयचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसतेय. एकेकाळची उदयची रिप्ड बॉडी, टोन्ड मसल्स गायब आहेत. उदयचे स्वत:कडे अजिबात लक्ष नाही, हे त्याच्या या फोटोंवरून स्पष्ट जाणवतेय आणि आता याचमुळे त्याच्याबद्दल वेगळीच चर्चा रंगू लागलीय. उदयच्या या वाढलेल्या वजनामागे नर्गिस फखरी तर नाही ना? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे



यावर्षी मे महिन्यात नर्गिस फखरी अभिनेता उदय चोप्रासोबत स्पॉट झाली होती. मुंबई एअरपोर्टवर दोघेही एकत्र बाहेर पडत असताना मीडियाने या दोघांना घेरले होते. यानंतर नर्गिस व उदय या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. खरे तर गतवर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते. अर्थात नर्गिसने हे वृत्त नाकारले होते.



ALSO READ : ​नर्गिस फखरी अन् उदय चोप्रा यांच्यात नाही काहीही ठीक! हा घ्या पुरावा!!

शिवाय उदय व ती रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही तिने खंडन केले होते. पण यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले म्हटल्यावर या दोघांच्या नात्याची चर्चा पुन्हा रंगली होती. पण अगदी अलीकडे नर्गिस व उदय यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी पुन्हा कानोकानी झाली. नर्गिसने उदयला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या बातमीला बळ मिळाले होते. े उदय स्वत:ला विसरतोय, यामागे हेच तर कारण नाही ना, असे आता बोलले जाऊ लागले आहे.

Web Title: Ripped body, missing toned masals, increased weight !! Do you know 'Uday Chopra'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.