रिमा सेनवर अश्लीलता पसरविण्याचा ठेवला ठपका; न्यायालयाने बजाविले अटक वॉरंट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 19:03 IST2017-08-20T11:57:11+5:302017-08-20T19:03:41+5:30

​‘मालामाल विकली’ आणि ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री रिमा सेन हिच्या विरोधात अश्लीलता पसरविल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते.

Rima Sen has blamed for spreading pornography; Warrant issued by court! | रिमा सेनवर अश्लीलता पसरविण्याचा ठेवला ठपका; न्यायालयाने बजाविले अटक वॉरंट !

रिमा सेनवर अश्लीलता पसरविण्याचा ठेवला ठपका; न्यायालयाने बजाविले अटक वॉरंट !

ालामाल विकली’ आणि ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री रिमा सेन हिच्या विरोधात अश्लीलता पसरविल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. होय, अभिनेत्री रिमा सेन बोल्ड सीन्स देण्यास कधीच मागे हटली नाही. ती अशाप्रकारचे सीन सहजपणे करायची. ज्यामुळे तिला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला. रिमावर अश्लीलता पसरविण्यावरून ठपका ठेवण्यात आला होता.  

२९ आॅक्टोबर १९८१ मध्ये जन्मलेल्या रिमा सेनने कोलकाता येथून तिचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमाविले. जबरदस्त अभिनय आणि बिनधास्त बोल्ड सीन्स देण्यावरून ती अल्पावधितच इंडस्ट्रीमध्ये हिट ठरली. याच कारणामुळे २००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अश्लील फोटोशूट करून अश्लीलता पसरविण्यावरून रिमाच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. रिमाचे हे फोटो एका तामिळ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. 



अशातही रिमाच्या बोल्डनेसवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. २०११ मध्ये तिने ‘इलावारसी’ या तामिळ चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती. कारण हे सीन्स खूपच आक्षेपार्ह होते. शिवाय याला नंतर विरोधही केला गेला. साउथ इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रिमा २००१ मध्ये मुंबईला आली होती. त्याचवर्षी तिने अभिनेता फरदीन खान याच्याबरोबर ‘हम हो गए आपके’ हा पहिला चित्रपट केला. मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. 

त्यानंतर रिमाने काही कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘मालामाल विकली’, ‘चल चला चल’, ‘जाल द ट्रॅप’ या चित्रपटांचा समावेश आहे. २०१२ मध्ये रिमा सेनने दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेलिअर शिवकरण सिंग याच्याबरोबर लग्न केले. सध्या रिमा इंडस्ट्रीमधून गायब असली तरी, तिने कमीत-कमी काळात तिचे चाहते निर्माण केले आहेत. रिमाला तिच्या करिअरमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी, तिच्या कारकिर्दीत चांगलीच वादग्रस्त राहिली आहे. 

Web Title: Rima Sen has blamed for spreading pornography; Warrant issued by court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.