'रिमा लागू रडायच्या थांबतच नव्हत्या आणि मी...', रेणुका शहाणेनं 'हम आपके है कौन'च्या सेटवरील सांगितला इमोशनल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 08:26 PM2023-04-28T20:26:50+5:302023-04-28T20:27:15+5:30

Renuka Shahane : रेणूका शहाणेनं एका मुलाखतीत 'हम आपके है कौन' चित्रपटातील ऑफस्क्रीन हा किस्सा सांगितला होता.

'Rima Lagoo couldn't stop crying and I...', Renuka Shahane told an emotional story on the sets of 'Hum Aapke Hai Kaun' | 'रिमा लागू रडायच्या थांबतच नव्हत्या आणि मी...', रेणुका शहाणेनं 'हम आपके है कौन'च्या सेटवरील सांगितला इमोशनल किस्सा

'रिमा लागू रडायच्या थांबतच नव्हत्या आणि मी...', रेणुका शहाणेनं 'हम आपके है कौन'च्या सेटवरील सांगितला इमोशनल किस्सा

googlenewsNext

सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)चा क्लासिक चित्रपट 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) आजही तितक्यात आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील सलमान आणि माधुरीच्या व्यक्तिरेखेशिवाय वहिनीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री रेणूका शहाणे(Renuka Shahane)ची भूमिका देखील रसिकांच्या कायम लक्षात राहिली. चित्रपटातील रेणूका शहाणेचा पायऱ्यावरून पडण्याचा सीन पाहून आजही अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी येते. पण तुम्हाला माहितीये का रेणूका शहाणेसाठी हा सीन करणे फार कठीण होते. तिच्या या सीननंतर सेटवरचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञदेखील रडायला लागले होते. तसेच चित्रपटात रेणुकाच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री रिमा लागू देखील ढसाढसा रडू लागल्या होत्या. रेणूका शहाणेनं एका मुलाखतीत चित्रपटातील ऑफस्क्रीन हा किस्सा सांगितला होता.

हम आपके है कौनचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी तर अभिनेत्री रेणूकाची या सीननंतर हात जोडून माफी मागितली होती. तेव्हा रेणूकाला ते माफी का मागत आहेत हेच समजत नव्हते. ती त्यांना म्हणाली होती की, तुम्ही माझी माफी का मागत आहात. हा सीन स्क्रिप्टचा भाग आहे. इतकेच नाही त्या सीनसाठी ज्या पायऱ्या वापरण्यात आल्या होत्या त्या देखील चांगल्या होत्या. त्याने माझ्या शरीराला दुखापत झाली नव्हती.

रेणूका शहाणे पुढे म्हणाली, ऑनस्क्रिन मरण्याचा अभिनय करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. सूरज बडजात्या यांना माझा चेहरा फार शिथिल हवा होता. माझ्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव त्यांना नको होते. माझे डोळे तेव्हा सारखे उघडझाप होत होते. त्यांनी मला आरामात श्वास घ्यायला सांगितला होता. तुम्ही चित्रपट आणि तो सीन नीट पाहिला तर त्या सीनमध्ये माझे डोळे पूर्णपणे बंद दिसत आहेत. जेव्हा सूरज यांनी सीननंतर कट असे म्हटले तेव्हा तिथे असलेल्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले होते. सगळ्यात जास्त भावुक तर रिमा लागू झाल्या होत्या. त्या भूमिकेत इतक्या शिरल्या होत्या की त्यांना अश्रू अनावर झाले. मेकअप रूममध्ये गेल्यानंतरही त्या बराच वेळ रडत होत्या.


रिमा ताई रडायच्या थांबतच नव्हत्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना मिठी मारल्या. त्यांना म्हटलं, शांत व्हा. हे प्रत्यक्षात नाही घडलेले.  त्या सीनमधून बाहेर येण्यासाठी रिमा लागू यांना बराच वेळ लागला होता, असे रेणुका शहाणेनं सांगितलं.

Web Title: 'Rima Lagoo couldn't stop crying and I...', Renuka Shahane told an emotional story on the sets of 'Hum Aapke Hai Kaun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.