​रिचा चढ्ढा पंजाबातील लहान शहरांत दाखविणार ‘खून आली चिट्ठी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:09 IST2017-01-25T11:39:10+5:302017-01-25T17:09:10+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या चित्रपटातून संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आलीय. यामुळेच बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत रिचाची वेगळी ...

Richa Chadha to appear in small towns in Punjab | ​रिचा चढ्ढा पंजाबातील लहान शहरांत दाखविणार ‘खून आली चिट्ठी’

​रिचा चढ्ढा पंजाबातील लहान शहरांत दाखविणार ‘खून आली चिट्ठी’

लिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या चित्रपटातून संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आलीय. यामुळेच बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत रिचाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तिने आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवले आहे. रुपिंदर इंदरजीत याने दिग्दर्शित केलेल्या पंजाबी भाषेतील ‘खून आली चिट्ठी’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. मागील वर्षी हा चित्रपट तयार झाला होता. केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर लहान शहरातही हा लघुपट पाहता यावा यासाठी ती प्रयत्न करणार असल्याचे समजते. 

‘खून आली चिट्ठी’ या लघुपटाची कथा १९८० व १९९० च्या काळातील आहे. खलिस्तान आंदोलनामुळे पंजाबात व्याप्त असलेला दहशतवाद यातून दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांनी याची प्रशंसा केली आहे. या चित्रपटातून समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यात पंजाबमध्ये झालेल्या दंगलीची माहिती देण्यात आली आहे. आता रिचा आपला चित्रपट पंजाबातील लहान शहरात दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून पंजाबात झालेल्या दंगलीची माहिती सर्वसामान्य माणसांना व्हावी हा विचार करीत आहे. पंजाबच्या दंगली या राज्यातील अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याने हा चित्रपट एका दस्तावेजाप्रमाणे असावा असे तिला वाटू लागले आहे. Read More : ​ऋचा चढ्ढाच्या आगामी ‘लव सोनिया’चा पहिला लूक



‘खून आली चिट्ठी’हा चित्रपट शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व तेथील शिक्षकांना दाखविण्याचा विचार रिचा करीत आहे. रिचा म्हणाली, ‘खून आली चिट्ठी’ हा असा चित्रपट आहे, ज्याचा मला अभिमान वाटतो. रुपिंदर माझा चांगला मित्र आहे, त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन के ले आहे. ८० च्या दशकातील पंजाबातील खलिस्तान आंदोलनावर हा चित्रपट असल्याने इतिहासाच्या दृष्टीने याची कथा महत्त्वाची आहे. कॉलेज विद्यार्थ्यांना याची माहिती असावी हे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे आम्ही या चित्रपटातला विविध शैक्षणिक संस्थामध्ये दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाय पंजाबातील लहान शहरांत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचाी आम्ही योजना आखत आहोत. रिचाचा हा प्रयत्न उल्लेखनीय आहे असेच म्हणावे लागेल. 

ALSO READ 
मला ही हिरोइतकेच मानधन मिळते
सिक्वेल्सकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा - रिचा चढ्ढा

Web Title: Richa Chadha to appear in small towns in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.