विचित्र फॅनमुळे रिचा त्रस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 22:02 IST2016-02-26T05:02:54+5:302016-02-25T22:02:54+5:30

‘सरबजीत’ या बायोपिकची पंजाबमध्ये शूटिंग सुरू आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा हे ...

Rich is troubled by a strange fan! | विचित्र फॅनमुळे रिचा त्रस्त!

विचित्र फॅनमुळे रिचा त्रस्त!

रबजीत’ या बायोपिकची पंजाबमध्ये शूटिंग सुरू आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच रिचा चढ्ढा देखील सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऐश्वर्याचे दलबीर कौरच्या भूमिकेतील काही फोटो व्हायरल झाले होते. पंजाब मध्ये संपूर्ण टीम चित्रपटाची शूटींग करत आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, ती तिथे एका विचित्र फॅनच्या त्रासाने त्रस्त झाली आहे. त्याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही. सरबजीतच्या सेटजवळ प्रेक्षकांची गर्दी होते. तेव्हा तिने केवळ फोटो काढण्याची आणि हॅण्डशेक करण्याची फॅन्सला परवानगी दिली होती. एका तरूणाने कुठूनतरी तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला मेसेज पाठवू लागला. वेगवेगळ्या नंबरवरून तिला कॉल करू लागला. आवाज बदलून बोलू लागला. त्याला नंबर कसा मिळाला हे तिला काही कळालेच नाही. तिने याविषयी पोलिसांत तक्रार केली की नाही हे अद्याप कळाले नाही. तिने शेवटी कंटाळून चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमला सांगितले. तेव्हा सेटवर आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणीही तिला भेटू शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: Rich is troubled by a strange fan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.