पुन्हा 12 जूनला सुशांतच्या घरी गेली होती का रिया? फोटोमुळे निर्माण झाली शंका...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:19 PM2020-09-01T16:19:23+5:302020-09-01T16:21:39+5:30

रियाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, यानंतर तिचं सुशांतसोबत काहीच बोलणं झालं नाही. कारण तिने रागाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. अशात आता सोशल मीडियात काही फोटो समोर आले आहेत.

Rhea Chakraborty at Sushant Singh Rajput's house on June 12 heres the proof | पुन्हा 12 जूनला सुशांतच्या घरी गेली होती का रिया? फोटोमुळे निर्माण झाली शंका...

पुन्हा 12 जूनला सुशांतच्या घरी गेली होती का रिया? फोटोमुळे निर्माण झाली शंका...

googlenewsNext

रिया चक्रवर्तीने मुंबई पोलीस, ईडी, सीबीआयला दिलेल्या जबाबात सांगितले होते की, ती ८ जून रोजी सुशांतचं घर सोडून गेली होती. रियाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, यानंतर तिचं सुशांतसोबत काहीच बोलणं झालं नाही. कारण तिने रागाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. अशात आता सोशल मीडियात काही फोटो समोर आले आहेत. जे रियाच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. प्रश्न हा आहे की, रिया १२ जूनला सुशांतच्या घरी गेली होती का? किंवा हेही शक्य आहे की, फोटो जुना असेल आणि शेअर १२ जूनला केला असेल.

रियाचे काही फोटो एका केक शॉपने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे सर्व फोटो १२ जूनचे आहेत आणि हे फोटो रियाने तिच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोत रियाने केस शॉपचे आभार मानले. यावेळी तिने सुशांतची एक्स मॅनेजर श्रुति मोदीचंही नाव घेतलं.

फोटोत दिसणाऱ्या फ्रेममुळे बांधले जात आहेत अंदाज

केक शॉपच्या इन्स्टाग्रामवर रियाचे अनेक फोटो आहेत. प्रश्न असा उभा राहतोय की, रिया चक्रवर्तीने १२ जून २०२० रोजी केक कुणासाठी मागवला होता? रियाच्या या फोटोत अगदी तिच्या मागे जी जागा दिसतेय ती सुशांतची लिव्हिंग रूमची आहे.  या रूममध्ये एका अॅस्ट्रॉनॉटचा फोटो लावलेला आहे. ज्याचा कोपरा अगदी तसाच आहे, जसा सुशांतच्या लिव्हिंग रूममध्ये आहे.

कदाचित जुना फोटो असेल

असंही असेल की हा फोटो जुना असेल. शक्यता अशीही आहे की, हे फोटो केक शॉपच्या प्रमोशनसाठी असतील. जे रियाने आधीच काढले असतील. सामान्यपणे स्टार्स लोकांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर हॅंडल करतात. अशात अशीही शक्यता आहे की, फोटो जुने असतील आणि केक शॉपसोबत प्रमोशनल डील झाल्यावर हे फोटो त्यांनी शेअर केले असतील.

रूमी जाफरींसोबत १२ जूनला झालं होतं बोलणं

१२ जून या तारखेबाबत एक शंका फिल्ममेकर रूमी जाफरी यांच्या बोलण्यातूनही निर्माण होते. रूमी यांनी सांगितले होते की, १२ जूनला त्यांनी सुशांतसोबत एक सिनेमा फायनल केला होता. ज्यात रिया मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणार होती. रूमी म्हणाले होते की, १२ जूनला त्यांच रिया आणि सुशांतसोबत बोलणं झालं होतं. इतकेच नाही त्यांनी हेही सांगितले होते की, ते दोघे सोबत होते.

हे पण वाचा :

सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सने केली रिया चक्रवर्तीच्या खोट्या दाव्याची पोलखोल, पॅरिसचे फोटो केलेत शेअर

रियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप

अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी

Web Title: Rhea Chakraborty at Sushant Singh Rajput's house on June 12 heres the proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.