रियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:12 PM2020-09-01T12:12:47+5:302020-09-01T12:24:03+5:30

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्तीने ८ जूनच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतचं घर सोडलं होतं आणि त्यानंतर १४ जून रोजी सुशांत घरात मृत आढळला होता. सुशांतच्या परिवाराने रियावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रोज नवनवीन दावे समोर येत आहेत. सीबीआय वेगाने केसचा तपास करत आहे आणि या केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची गेल्या ५ दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. रिया चक्रवर्तीने ८ जूनच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतचं घर सोडलं होतं आणि त्यानंतर १४ जून रोजी सुशांत घरात मृत आढळला होता. सुशांतच्या परिवाराने रियावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत. पण आता रियाच्या वकिलाने सुशांतच्या परिवारावर आरोप लावले आहेत.

बहीण प्रियंकाने बदलली होती सुशांतची औषधे? - इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, सुशांतची बहीण प्रियांका सिंहने डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनशिवाय काही औषधे दिली होती. प्रियांका स्वत: वकील आहे आणि सुप्रीन कोर्टात प्रॅक्टीस करते. मानेशिंदे म्हणाले की, जेव्हा प्रियांकाने सुशांतची औषधे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बदलली तेव्हा रियाने ८ जूनला सुशांतचं घर सोडलं होतं. पण सुशांतच्या परिवाराने दावा केला होता की, त्यांना सुशांतच्या तब्येतीबाबत किंवा डिप्रेशनबाबत काही माहीत नव्हते.

रियाने केला होता विरोध - मानेशिंदे म्हणाले की, सीबीआय आणि ईडीला दिलेल्या आपल्या जबाबात रियाने सांगितले की, ८ जूनला प्रियांका सुशांतसोबत बोलली होती आणि त्याला विना प्रिस्क्रिप्सन तीन औषधे घेण्यास सांगितले होते. रियाने या गोष्टीला विरोध केला होता. कारण सुशांत आधीच त्याच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे घेत होता. यावरून रिया आणि सुशांतमध्ये वाद झाला होता. ज्यानंतर सुशांतने रियाला घर सोडून जाण्यास सांगितले होते.

राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या डॉक्टरने दिली औषधे? - मानेशिंदे यांनी असाही दावा केला आहे की, सुशांतच्या परिवाराला त्याच्या मानसिक स्थितीबाबत माहिती होती. ते असंही म्हणाले की, सुशांतच्या परिवाराचा रियावरील सुशांतला औषध देण्याच्या दाव्याला काहीच आधार नाही. मानेशिंदे यांनी दावा केला की, दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने सुशांतला औषधे कशी प्रिस्क्राइब केली. तो तर मुंबईत होता. ते म्हणाले की, सुशांत आपल्या घरातून बाहेरच निघाला नाही तर दिल्लीच्या हॉस्पिटलमधील ओपीडीचं प्रिस्क्रीप्शन कसं आलं.

बहिणी करत होत्या सुशांतला कंट्रोल? - मानेशिंदे यांनी दावा केला की, सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह पूर्णपणे त्याची लाइफ कंट्रोल करत होत्या. हा आरोप चुकीचा आहे की रिया सुशांतचे सर्व निर्णय घेत होती. मानेशिंदे म्हणाले की, सीबीआय आपला तपास करत आहे आणि ते योग्यवेळी रियाकडून कायदेशीर पावले उचलतील.

८ जूनला काय घडलं? - दरम्यान, मुलाखतीत रियाने सुशांतचं घर सोडण्याबाबत डिटेल्ड माहिती दिली होती. रियाने सांगितले की, '८ जून रोजी माझं एक थेरपी सेशन बुक होतं. डॉक्टर सुजेन वॉकर यांच्यासोबत. ते सकाळी ११.३० वाजता येणार होते. यातून हे स्पष्ट होतं की ८ जूनला सुशांतचं घर सोडून जाण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी माझ्या घरी हे थेरपी सेशन करू शकत नव्हते. माझी अजिबात इच्छा नव्हती की, मला माझ्या परिवाराने अशा स्थितीत बघावं. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना असं बघू शकणार नाहीत'.

ती म्हणाली होती की, 'त्यामुळे ८ जूनला जेव्हा माझं थेरपी सेशन होतं, तेव्हा मी सुशांतला हे सांगितलं होतं. तर मला नाही म्हणाला. तो म्हणाला की, आज थेरपी सेशन इथे करू नकोस. तू तुझ्या घरी जा. तर मी त्याला म्हणाले की, मला थेरपी सेशन करून जाऊ दे. तरी तो नाही म्हणाला. त्याने मला थेरपी सेशनआधीच जाण्यास सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याची बहीण येत आहे. तिचा फोन आला होता'.

'जून महिन्यात तो त्याच्या बहिणींसोबत आणि वडिलांसोबत सतत फोनवर बोलत होता. त्यांना सांगत होता की, चो कूर्गमध्ये शिफ्ट होण्याचा प्लॅन करत आहे. तर तुमच्यापैकी माझ्यासोबत कोण येईल. मला कोण मदत करेल. पण याचं कुणीही उत्तर दिलं नाही की, ते येणार की नाही'.

'फायनली ८ तारखेला तो मला म्हणाला की, तू तुझ्या घरी जाच. तर मी त्याला बोलली की, मी जाते पण एक अट आहे. ती म्हणजे तुझी बहीण मुंबईत राहते, गोरेगावमध्ये, मीतू जी, त्यांना बोलव. त्या आल्या की मी जाते'.