REVEALED: दीपिका पदुकोणला करायचा आहे ‘या’ हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 17:56 IST2017-01-21T12:26:14+5:302017-01-21T17:56:14+5:30

दीपिका पदुकोण आता ग्लोबल सुपरस्टार झाली आहे. बॉलीवूडनंतर तिने हॉलीवूडकडे मोर्चा वळवला आणि पहिल्याच चित्रपटात विन डिझेलसारख्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत ...

REVEALED: Romance with a Hollywood actor who is about to make Deepika Padukone | REVEALED: दीपिका पदुकोणला करायचा आहे ‘या’ हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स

REVEALED: दीपिका पदुकोणला करायचा आहे ‘या’ हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स

पिका पदुकोण आता ग्लोबल सुपरस्टार झाली आहे. बॉलीवूडनंतर तिने हॉलीवूडकडे मोर्चा वळवला आणि पहिल्याच चित्रपटात विन डिझेलसारख्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम केले. तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ द झेंडर केज’ हा चित्रपट आता कुठे रिलीज झालेला आहे आणि दीपिकाला दुसऱ्या हॉलीवूडपटाचेही वेध लागले आहेत.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने एका स्पेशल हॉलीवूड अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तो अभिनेता म्हणजे जगभरातील मुलींच्या गळ्यातील ताईत रायन गोस्लिंग आहे. ‘ला ला लँड’ स्टार रायनसोबत रोमान्स करण्यास आतूर झाली आहे.

ती म्हणाली, ‘ला ला लँड’ चित्रपट पाहून तर मी त्याच्या प्रेमातच पडले. त्या चित्रपटातील एक ना एक गोष्ट सुपरहिट आहे. त्यातीत अभिनय, कथा, दिग्दर्शन, गाणी असे सगळेच एकदम मस्त जमून आले आहे. ही एकदम क्लासिक लव्हस्टोरी असून पाहायला खूपच सुंदर आहे. रायनने तर सर्वोत्तम अभिनय केला असून त्याच्यासोबत मला काम करायला नक्कीच आवडेल.’ यंदाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ‘ला ला लँड’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सात पुरस्कारांवर बाजी मारली. त्यात रायन गोस्लिंगच्या बेस्ट अ‍ॅक्टरचाही समावेश आहे.

ALSO READ: दीपिका पदुकोण का कर्म्फटेबल नाही तिच्या गाऊनमध्ये?

‘फोर्ब्स’ मासिकाच्या वार्षिक टॉप १० लिस्टमध्ये स्थान मिळवणारी दीपिका एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जेनेफर लॉरेन्स, ज्युलिया रॉबर्ट्स आणि जेनेफर अ‍ॅनिस्टन सारख्या दिग्गज सेलिब्रेटींचा या टॉप-१० यादीमध्ये समावेश आहे. महिला कलाकारांना पुरुषांपेक्षा कमी मानधन देण्यात येते. याविषयी तिची भूमिका काय असे विचारले असता ती म्हणते, ‘हे खरंच चुकीचे आहे. पण मी तो मुद्दा घेऊन निर्मात्यांशी भांडत नाही. मी माझ्या कामातून दाखवून देते की, इतर कोणत्याही कलाकारांप्रमाणेच महिलादेखील तेवढ्याच कार्यक्षम आहेत.’

दीपिकाने नुकतीच ‘द एलेन डिजेनेरस शो’वर हजेरी लावली. यावेळी तिने वडिल प्रकाश पदुकोण यांच्या बॅडमिंटन करिअरविषयी अभिमानाने माहिती दिली. ‘द लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डन’ या शोवर तिने विन डिझेलवर सिक्रेट क्रश असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर जेम्स कॉर्डनला ‘लुंगी डान्स’देखील शिकवला.

ALSO READ: ​दीपिका पदुकोणला हवेत विन डिझलसोबत मुले!

Web Title: REVEALED: Romance with a Hollywood actor who is about to make Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.