Revealed : ​हृतिक रोशनचा पर्सनल मोबाईल नंबर हवायं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 13:59 IST2017-01-23T07:48:06+5:302017-01-23T13:59:20+5:30

हृतिक रोशनचा ‘काबील’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सध्या हृतिक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान हृतिकने एक मुलाखत दिली. ...

Revealed: Hrithik Roshan's Personal Mobile Number? | Revealed : ​हृतिक रोशनचा पर्सनल मोबाईल नंबर हवायं?

Revealed : ​हृतिक रोशनचा पर्सनल मोबाईल नंबर हवायं?

तिक रोशनचा ‘काबील’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सध्या हृतिक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान हृतिकने एक मुलाखत दिली. आता तुम्ही म्हणाल स्टार लोकांच्या मुलाखतीत असे काय विशेष? पण विशेष आहे. हृतिकची ही मुलाखत इतर बॉलिवूड स्टार्सच्या मुलाखतीपेक्षा वेगळी ठरली. कारण या मुलाखतीत हृतिकने चक्क त्याचा मोबाईल नंबर शेअर केला. विश्वास नाही ना बसत? पण हे खरे आहे. केवळ मोबाईल नंबरच नाही तर घराचा पत्ता, आवडते पदार्थ अशा अनेक पर्सनल गोष्टींबद्दल तो अगदी उघड उघड बोलला.  एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या ओघात हृतिकने ९८४५२४६४६२ हा माझा मोबाईल नंबर असल्याचे सांगितले.

तू सध्या कुणाला डेट करतो आहेस? असा एक प्रश्नही हृतिकला विचारण्यात आला. यालाही हृतिकने अतिशय प्रांजळ उत्तर दिले. मी सध्या कुणालाच डेट करत नसल्याचे त्याने सांगितले.  हृतिक रोशन गोरा आहे का? हृतिक रोशन उंच आहे का? हृतिक डाव्या हाताने सर्व कामे करतो का? अशा काही विचित्र प्रश्नांनाही हृतिकने यावेळी उत्तरे दिलीत.

हृतिक रोशन व यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘काबील’ लवकरच प्रदर्शित होत आहे. यात हृतिक व यामी दोघांनाही अंध व्यक्तिंची भूमिका साकारली आहे. अभिनेता रॉनित रॉय आणि रोहित रॉय या दोघा सख्ख्या भावांनी चित्रपटात खलनायकांची भूमिका साकारली आहे. हृतिकच्या पत्नीची भूमिका साकारणाºया यामीचा मृत्यू होतो आणि यानंतर कथेमध्ये ट्विस्ट येतो.  
बॉक्स आॅफिसवर हृतिकचा काबिल आणि शाहरुख खानच्या रईस चित्रपटाची टक्कर पाहावयास मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर या दोन्ही चित्रपटांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Related stories : ​‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!
हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?

Web Title: Revealed: Hrithik Roshan's Personal Mobile Number?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.