'ती टाईमपास आहे फक्त'; जितेंद्रचे शब्द ऐकून कोलमडून पडली होती रेखा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 02:09 PM2023-11-28T14:09:03+5:302023-11-28T14:09:28+5:30

Rekha: त्याकाळात जितेंद्रसोबतही रेखाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

retro-when-jeetendra-called-rekha-time-pass-actress-heart-broken-breaks-relationship | 'ती टाईमपास आहे फक्त'; जितेंद्रचे शब्द ऐकून कोलमडून पडली होती रेखा

'ती टाईमपास आहे फक्त'; जितेंद्रचे शब्द ऐकून कोलमडून पडली होती रेखा

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (rekha) हिच्या प्रोफशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्य सर्वाधिक वेळा चर्चिलं गेलं. आजही तिच्या जीवनातील अनेक किस्से चर्चिले जातात. यात खासकरुन तिच्या अफेअरविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. रेखाचं नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. यातलाच एक अभिनेता म्हणजे जितेंद्र. 'एक बेचारा' या सिनेमाच्या दरम्यान ही जोडी एकमेकांना डेट करु लागली होती असं म्हटलं जातं. परंतु, जितेंद्रचं प्रेम खोटं होतं हे रेखाला कळून चुकलं. जितेंद्रने तिला उद्देशून असे काही शब्द वापरले होते जे ऐकून रेखा कोलमडून पडली होती.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या व्यतिरिक्त रेखाचं नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं असेल तर तो अभिनेता म्हणजे जितेंद्र.  यासिर उस्मान यांनी रेखा: द अनटोल्ट स्टोरी या रेखाच्या बायोग्राफीमध्ये याविषयी खुलासा केला आहे.
रेखा आणि जितेंद्र शिमलामध्ये एक बेचारा या सिनेमाचं शूट करत होते. रेखा पहिल्यांदाच मनापासून कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. तिला त्याच्याविषयी प्रेम, आदर वाटत होता. जितेंद्र जेव्हा जेव्हा तिच्या समोर यायचा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चकाकी यायची. त्यामुळे अखेर न रहावून रेखाने जितेंद्रसमोर तिचं प्रेम व्यक्त केलं.

फार काळ नाही टिकलं दोघांचं नातं

रेखा आणि जितेंद्र एकमेकांना त्याकाळी डेट करु लागले. पण, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. जितेंद्र केवळ रेखाला टाइमपास समजत होता असं त्यांच्या बायोग्राफीत लिहिलं आहे. एकदा जितेंद्र त्याच्या ज्युनिअर आर्टिस्टला म्हणाला की, रेखा फक्त एक टाइमपास आहे. त्याचे हे शब्द रेखाने ऐकले आणि ती पार कोलमडून गेली. ती रडत रडत तिच्या मेकअप रुममध्ये गेली.

३९ सिनेमात केलं एकत्र काम

रेखा आणि जितेंद्र यांनी जवळपास ३९ सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. 'एक ही भूल', 'अमीरी गरीबी', 'सदा सुहागन', 'मांग भरो सजन' अशा कितीतरी सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे.

Web Title: retro-when-jeetendra-called-rekha-time-pass-actress-heart-broken-breaks-relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.