​रेस्ट इन पीस, माय लव्ह...! बोनी कपूर यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 10:18 IST2018-03-01T04:40:11+5:302018-03-01T10:18:30+5:30

बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी स्वत: अनंताच्या प्रवासाला निघून गेली आणि जाताना मागे अनेकांना एकटी सोडून गेली. विशेषत: पती बोनी कपूर ...

Rest in Peace, My Love ...! Boney Kapoor wrote an erotic post !! | ​रेस्ट इन पीस, माय लव्ह...! बोनी कपूर यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!

​रेस्ट इन पीस, माय लव्ह...! बोनी कपूर यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!

लिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी स्वत: अनंताच्या प्रवासाला निघून गेली आणि जाताना मागे अनेकांना एकटी सोडून गेली. विशेषत: पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली खुशी कपूर व जान्हवी कपूर हे श्रीदेवींच्या जाण्याने तुटून पडले आहेत. काल श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेत. यादरम्यान बोनी पूर्णवेळ फक्त श्रीदेवींचा निपचिप पडलेला चेहरा न्याहाळत होते. श्रीदेवी अनंतात विलीन झाल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. श्रीदेवींच्याच टिष्ट्वटर हँडलवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून संवेदनशील डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाहीत.
एक मित्र, पत्नी आणि दोन तरूण मुलींची आई गमावल्याचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाही, अशी सुरुवात बोनींनी केली आहे. या दु:खद घडीला सोबत करणारे मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आणि चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. विशेषत: अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर या दोघांनी सगळे काही विसरून दाखवलेला मनाचा मोठेपणा पाहून भारावलेल्या बोनींनी त्यांचा खास उल्लेख केला आहे. अर्जुन व अंशुला हे दोघेही माझी ताकद बनून माझ्यासोबत राहिले. जान्हवी आणि खुशीला त्यांनी धीराने सांभाळले, असे बोनींनी लिहिले आहे. बोनींचे हे पत्र वाचा त्यांच्याच शब्दांत....


एक मित्र, पत्नी आणि दोन मुलींची आई गमावल्याचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दु:खात आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेलेले माझे संपूर्ण कुटुंब, मित्र, शुभचिंतक आणि श्रीदेवींच्या असंख्य चाहत्यांचे मी आभार मानतो. अर्जुन व अंशुला या दोघांकडून मिळालेल्या प्रेमासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. जान्हवी आणि खुशीला त्यांनी धीराने सांभाळले. एक कुटुंब म्हणून हे असह्य दु:ख सहन करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जगासाठी ती त्यांची ‘चांदनी’ होती. एक सर्वोत्तम कलाकार,..त्यांची श्रीदेवी. पण माझ्यासाठी ती माझे प्रेम होती. माझी मैत्रिण होती. माझ्या दोन मुलींची आई होती. माझी सहचारिणी होती. माझ्या दोन्ही मुलींसाठी ती सर्वस्व होती. त्यांचे आयुष्य होती. आमचे अख्खे कुटुंब तिच्या भोवती फिरायचे. याक्षणाला मी माझी पत्नी आणि जान्हवी व खुशीच्या आईला निरोप देत आहोत. या क्षणी दु:ख सहन करण्यासाठी आम्हाला हव्या असणाºया खासगी क्षणांचा सन्मान व्हावा, हीच माझी विनंती आहे.तुम्हाला श्रीबद्दल बोलायचे तर तिच्या आठवणींबद्दल बोला. कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यावर कधीच पडदा पडू शकत नाही. तो नेहमीच चंदेरी पडद्यावर चमकत राहतो. सध्या मी माझ्या दोन्ही मुलींप्रति आणि श्रीशिवाय पुढे जाण्याच्या कल्पनेने चिंतीत आहे. ती आमचे आयुष्य होती. आमची हिंमत होती आणि आमच्या हसण्याचे कारण होती. आम्ही तिच्यावर प्रचंड प्रेम करायचो, करत राहू.
रेस्ट इन पीस, माय लव्ह... आमचे आयुष्य पुन्हा आधीसारखे कधीच होणारे नाही...!

- बोनी कपूर

ALSO READ : श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर कपूर परिवाराने मानले चाहत्यांचे आभार!

Web Title: Rest in Peace, My Love ...! Boney Kapoor wrote an erotic post !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.