​आदर जैन व अन्या सिंह...हे आहेत ‘यशराज’चे दोन नवे चेहरे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 15:20 IST2017-07-05T09:50:14+5:302017-07-05T15:20:14+5:30

यशराज बॅनरखाली लॉन्च होणे, यासाठी वेगळे नशीब हवे. रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांच्यासह ...

Respected Jain and Anya Singh ... are two new faces of 'Yash Raj' !! | ​आदर जैन व अन्या सिंह...हे आहेत ‘यशराज’चे दोन नवे चेहरे!!

​आदर जैन व अन्या सिंह...हे आहेत ‘यशराज’चे दोन नवे चेहरे!!

राज बॅनरखाली लॉन्च होणे, यासाठी वेगळे नशीब हवे. रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांच्यासह अनेक स्टार्सला यशराज फिल्म्सने लॉन्च केले. विशेष म्हणजे, या सगळ्या स्टार्सनीही यशराज बॅनरचे नाव मोठेच केले. आता अशाच दोन नव्या चेहºयांना यशराज लॉन्च करणार आहे. होय, म्हणजेच बॉलिवूडमध्ये दोन नवे चेहरे येत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, अन्या सिंह आणि आदर जैन.



आदर जैनची ओळख आम्ही तुम्हाला यापूर्वीही करून दिली आहेच. आदर जैन म्हणजे, बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राज कपूर यांचा नातू. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन हिचा मुलगा. यशराज बॅनरखाली आदरचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होत आहे. आदरने यापूर्वी करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. आदर जैनचा मोठा भाऊ अरमान जैन हा सुद्धा ‘हम दिवाना दिल’मधून बॉलिवूड डेब्यू करून चुकला आहे. अरमान बॉलिवूडमध्ये फार काही अचिव्ह करू शकला नाही. आता आदरला या ग्रॅण्ड लॉन्चिंगचा किती फायदा होतो, ते बघण्यासारखे असेल.



आदरच्या अपोझिट अन्या सिंह हा नवा कोरा चेहर दिसणार आहे. अन्या ही दिल्लीची राहणारी आहे. आदरच्या अपोझिट हिरोईन शोधण्यासाठी यशराज बॅनर्सने दिल्ली, चंदीगड अशा अनेक शहरात मुलींचा शोध घेतला. अखेर हा शोध अन्या सिंह जवळ येऊन थांबला. तूर्तास सगळ्यांच्या नजरा आदर व अन्या सिंह या दोघांवर खिळल्या आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव अद्याप जाहिर झालेले नाही. लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूयात. 

Web Title: Respected Jain and Anya Singh ... are two new faces of 'Yash Raj' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.