बिग बींच्या नातवाने नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये काम करण्यास दिला नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:58 PM2023-10-10T17:58:32+5:302023-10-10T18:01:26+5:30

या चित्रपटातील लक्ष्मणच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला विचारण्यात आले होते.

Reports claim agastya nanda refuses to play laxman in ranbir kapoor sai pallavi nitesh tiwari ramayan | बिग बींच्या नातवाने नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये काम करण्यास दिला नकार, कारण...

बिग बींच्या नातवाने नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये काम करण्यास दिला नकार, कारण...

नितीश तिवारीच्या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाबाबत सतत चर्चा ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाला घेऊन रोज काही ना काही अपडेट येतच असतात. आता बातमी अशी आहे की या चित्रपटातील लक्ष्मणच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला विचारण्यात आले होते.


या चित्रपटात प्रभू श्री रामांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार आहे तर माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे.  'रामायण'च्या उर्वरित स्टारकास्टबद्दल अद्याप कोणतीही बातमी आलेली नव्हती, परंतु आता या चित्रपटातील लक्ष्मणच्या व्यक्तिरेखेबद्दल एक अपडेट समोर आले आहे. खरं तर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी लक्ष्मणची भूमिका साकारण्यासाठी अगस्त्य नंदाशी संपर्क साधला होता.

रिपोर्ट्सनुसार, नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये अगस्त्याला भगवान श्री रामांचा धाकटा भाऊ लक्ष्मणची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, अगस्त्याने ही भूमिका साकारण्यास नकार दिला. रिपोर्टनुसार, करिअरच्या या टप्प्यावर अगस्त्यला सेकेंड लीडची भूमिका करायची नाहीय. त्यामुळे त्याने ही भूमिका नाकारली आहे. अगस्त  'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. इतकेच नाही तर त्याच्याकडे श्रीराम राघवनचा 'इक्किस' नावाचा पुढचा चित्रपट आहे.

रामायण सिनेमाबाबत बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार रणबीर आणि साई फेब्रुवारी २०२४ पासून शूटिंग सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू राम आणि सीता यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट २०२४ पर्यंत संपणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्कर विजेती कंपनी DNEG चित्रपटासाठी VFX बनवणार आहे.
 

Web Title: Reports claim agastya nanda refuses to play laxman in ranbir kapoor sai pallavi nitesh tiwari ramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.