Remo Dsouza : 'अवली लवली कोहली' वर रेमोनेही केला डान्स; म्हणाला 'खूप मजा आली...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:00 IST2023-01-17T15:58:47+5:302023-01-17T16:00:29+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली गाजलेली फॅमिली म्हणजे कोहली फॅमिली.

Remo Dsouza : 'अवली लवली कोहली' वर रेमोनेही केला डान्स; म्हणाला 'खूप मजा आली...'
Remo Dsouza : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली गाजलेली फॅमिली म्हणजे कोहली फॅमिली. या फॅमिलीची महाराष्ट्रभर चर्चा आहे. जिकडे तिकडे अवली लवली कोहली गाण्यावर रील्स दिसत आहेत. मग अगदी डान्स मास्टर रेमो डिसूजा सुद्धा या गाण्यावर तुफान नाचला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरतोय. त्यातच आजकाल कोणताही विषय घेत रील्स बनवले जातात आणि ते व्हायरल होतात. आता हास्यजत्रा मधल्या कोहली फॅमिलीचे रीलही सोशल मीडियावर सर्रास व्हायरल होत असतात.मग डान्स मास्टर रेमोलाही या रीलची भूरळ पडली आणि त्याने मित्रांसोबत या रीलवर डान्स केला. एका इमारतीच्या खाली तो आणि त्याचे आणखी तीन मित्र डान्स करत असून त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्राची त्यागी हिने सोशल मीडियावर रेमोला टॅग करुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर रेमोने व्हिडिओ खाली कमेंटही केली आहे. खूप मज्जा आली असे त्याने लिहिले आहे. सोबतच हॅशटॅग महाराष्ट्राची हास्यजत्रा लिहित त्याने कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.