‘हाथी मेरे साथी’चा रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:50 IST2016-02-25T16:50:05+5:302016-02-25T09:50:05+5:30
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना याच्या सुपरहिट ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचा रिमेक पे्रक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमध्ये तशी ...

‘हाथी मेरे साथी’चा रिमेक
ब लिवूड सुपरस्टार राजेश खन्ना याच्या सुपरहिट ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचा रिमेक पे्रक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमध्ये तशी चर्चा रंगली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे नामवंत दिग्दर्शक प्रभू सोलोमन ‘हाथी मेरे साथी’ एका वेगळ्या व आधुनिक ढंगात प्रेक्षकांसोबत घेऊ इच्छितात. ‘इरोज इंटरनॅशनल’कडे या चित्रपटाचे अधिकार आहे. तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात इरोज व सोलोमन यांच्यात चर्चा झाल्याचेही कळते. ‘हाथी मेरे साथी’चा रिमेक हा हुबेहुब निक्कल नसेल. चित्रपटाची कथा ताजी असेल. त्यात अनेक अॅक्शन दृश्यांची भरमार असेल. शिवाय देशात व विदेशात त्याचे चित्रीकरण होईल. या बिग बजेट चित्रपटाची फाइनल स्क्रिप्ट तयार होत आहे. ती तयार झाल्यानंतर बजेट फायनल होणार आहे.
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात राजेश खन्ना शिवाय तनुजा,के. एन. सिंह व मदन पुरी मुख्य भूमिकेत होते.
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात राजेश खन्ना शिवाय तनुजा,के. एन. सिंह व मदन पुरी मुख्य भूमिकेत होते.