THROWBACK: उशीरा का होईना मंदाकिनीने आपला ‘बदला’ घेतलाच...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 09:55 AM2023-01-05T09:55:00+5:302023-01-05T09:55:02+5:30

Kumar Gaurav-Mandakini: किस्सा आहे मंदाकिनी अन् एका रात्रीत स्टार झालेल्या कुमार गौरवचा...

Reliving the Bitter Rivalry Between Kumar Gaurav-Mandakini | THROWBACK: उशीरा का होईना मंदाकिनीने आपला ‘बदला’ घेतलाच...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

THROWBACK: उशीरा का होईना मंदाकिनीने आपला ‘बदला’ घेतलाच...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

googlenewsNext

Kumar Gaurav-Mandakini : अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. 1981 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून कुमार गौरवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कुमारचे नशीब इतकं चांगलं की,  त्याचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला.  कुमार गौरव नावाचा हिरो रातोरात स्टार झाला. तरूणी तर त्याच्यावर अक्षरश: फिदा झाल्यात.  पण म्हणतात ना, यश सगळ्यांनाच पचवता येत नाही... तसंच काही कुमार गौरव बद्दल झालं. रातोरात स्टार झालेल्या कुमार गौरवच्या डोक्यात लगेच  हवा गेली. मग काय, पठ्ठ्याने थेट जाहिरचं करून टाकलं, ‘मी यापुढे फक्त नंबर 1 अर्थात आघाडीच्या अभिनेत्रींसोबतचं काम करणार....’ त्याच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. त्याला नव्या हिरोईनसोबत काम करायचं नव्हतं.   

दिनेश बन्सल यांनी त्यांच्या ‘शिरीन फरहाद’ चित्रपटासाठी यास्मीन नावाच्या नव्या मुलीला साईन केलं होतं. त्यांना या चित्रपटासाठी फक्त कुमार गौरवच हवा होता. कुमार गौरव हा सिनेमा करायला राजी झाला. अर्थात अट फक्त एकच, ती म्हणजे, ‘ ती नवी हिरोईन मला नको’.  मी नव्या मुलीसोबत काम करणार नाही, असं सांगून कुमारने यास्मीनसोबत काम करण्यास नकार दिला. बन्सल यांनी हरप्रकारे कुमारची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कुमार गौरव मानेना. अखेर त्याने सिनेमाच नाकारला. याचा परिणाम म्हणजे, चित्रपट बंद झाला. बिचारी यास्मीन पहिल्याच सिनेमात कुमार गौरवसोबत काम करायला मिळणार म्हणून खूश्श होती. पण कुमारच्या नकारानंतर आणि सिनेमा बंद पडल्याचं ऐकून ती देखील हिरमुसली आणि आल्या पावली परत गेली. पण म्हणतात ना, नशीब बदलायला वेळ लागत नाही... 

चार वर्षानंतर हीच यास्मीन मंदाकिनी बनून परतली.  यास्मीनने ‘राम तेरी गंगा मैली’साठी ऑडिशनदिलं आणि तिची निवड झाली.  चित्रपट सुपरहिट झाला आणि मंदाकिनी स्टार बनली. त्यावेळी कुमार गौरव कुठे होता? तर त्याच्यावर फ्लॉप स्टारचा शिक्का बसला होता. आता कुठलीही मोठी हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हती... मंदाकिनी स्टार झालेली पाहून कुमार गौरवला नेमकी तीच आठवली. कारण त्याला एका हिट हवा होता आणि यासाठी हिट अभिनेत्री हवी होती.

कुमारने  एका निर्मात्याला तिचं नाव सुचवलं.  त्याचा प्रस्ताव घेऊन निर्माता मंदाकिनीकडे गेला. तिने हिरो कोण? असा प्रश्न केला आणि कुमार गौरवचं नाव ऐकताच ती जाम भडकली. तिने थेट नकार कळवला. त्याला बदला, हवं तर एखादा नवोदित हिरो घ्या, मला चालले. पण मी कुमार गौरवसोबत अजिबात काम करणार नाही, असं तिने स्पष्ट शब्दांत सुनावलं. एकंदर काय तर यास्मीनने उशीरा का होईना बदला घेतलाच...!!
 

Web Title: Reliving the Bitter Rivalry Between Kumar Gaurav-Mandakini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.