'बागी २'च्या रिलीज होण्याआधीच 'बागी ३'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 11:37 IST2018-02-20T06:07:31+5:302018-02-20T11:37:31+5:30

'बागी२' चे चित्रीकरण अद्याप पूर्ण झाले नाही आहे पण ह्या चित्रपटाच्या मेकर्सनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या ...

Before the release of 'rebel 2', 'rebel 3' was announced | 'बागी २'च्या रिलीज होण्याआधीच 'बागी ३'ची घोषणा

'बागी २'च्या रिलीज होण्याआधीच 'बागी ३'ची घोषणा

'
;बागी२' चे चित्रीकरण अद्याप पूर्ण झाले नाही आहे पण ह्या चित्रपटाच्या मेकर्सनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याची घोषणा केली आहे. फॉक्स स्टुडिओ आणि साजिद नाडीयादवला निर्मित व अहमद खान दिग्दर्शित  बागी २ येत्या ३० मार्चला प्रदर्शित होत आहे.

नवल म्हणजे बागीचे चित्रीकरण अजून पूर्ण झाले नाही आणि फिल्ममेकर्सनी बागीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. साजिद नाडीयादवलाने आपल्या ट्विटर अकाऊंटमधून आज म्हणजेच १९ फेब्रुवारीला 'बागी३' ची घोषणा केली आहे. ट्विटरवर साजिदने म्हटले आहे की "आमचा उत्साह त्रिगुणीत झाला आहे''.

अहमद खान दिग्दर्शित 'बागी ३' चे पहिल्या टप्प्याचे शूटिंग डिसेंबरमध्ये चीन इथे सुरू होईल आणि त्यनंतरचे चित्रीकरण जपानमध्ये केले जाईल. 'बागी २'बद्दल आय एन एसशी बोलताना साजिदने म्हटले की 'बागी २' आमच्यासाठी एक सुखद अनुभव आहे.  टायगर एक हुशार आणि चिकाटीचा अभिनेता आहे तर अहमद खान ज्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे  हा सुद्धा आपल्या कामाला घेऊन टायगर सारखाच आहे. 'बागी 2' टायगरसोबत दिशा पटानी दिसणार आहे. दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा पडद्यावर बघायला मिळणार आहे. बागी 2मध्ये टायगर व दिशाची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होते. पण दिशाचे टायगरऐवजी दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो.‘बागी2’ हा ‘बागी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. यावेळी मात्र श्रद्धाच्या जागी दिशाची वर्णी लागली आहे. ‘बागी’मध्ये टायगर श्रद्धाला वाचवताना दिसला होता. पण ‘बागी2’मध्ये तो दिशाच्या मुलाला वाचवताना दिसेल. खरे ‘बागी2’साठी श्रद्धाही उत्सूक होती. पण दिशा व टायगरची रिअल लाईफ केमिस्ट्री कॅश करण्यासाठी मेकर्सने श्रद्धाला डच्चू देत दिशाला कास्ट केले. साजिद नाडियाडवाला बॅनरखाली तयार करण्यात येणार आहे.

ALSO READ :  OMG! टायगर श्रॉफवर गर्लफ्रेन्ड दिशा पटनीने लादले अनेक कडक नियम!!

Web Title: Before the release of 'rebel 2', 'rebel 3' was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.