​‘पद्मावत’च्या रिलीजपूर्वी दीपिका पादुकोण बाप्पाच्या दरबारात, सिद्धीविनायकाला साकडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 14:19 IST2018-01-23T08:37:51+5:302018-01-23T14:19:02+5:30

‘पद्मावत’ रिलीजसाठी एकदम सज्ज आहे.   सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदीची मागणी करणा-या सर्व याचिका निकाली काढत, ‘पद्मावत’ला हिरवी झेंडी ...

Before the release of Padmavat, Deepika Padukone Bappa's court, Siddhi Vinayakara | ​‘पद्मावत’च्या रिलीजपूर्वी दीपिका पादुकोण बाप्पाच्या दरबारात, सिद्धीविनायकाला साकडे!!

​‘पद्मावत’च्या रिलीजपूर्वी दीपिका पादुकोण बाप्पाच्या दरबारात, सिद्धीविनायकाला साकडे!!

द्मावत’ रिलीजसाठी एकदम सज्ज आहे.   सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदीची मागणी करणा-या सर्व याचिका निकाली काढत, ‘पद्मावत’ला हिरवी झेंडी दिली आहे. पण तरिही करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांचा या चित्रपटाला सुरु असलेला विरोध सुरु आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ‘पद्मावत’ची लीड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण आज मंगळवारी मुंबईत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. चित्रपटाचे प्रदर्शन निर्विघ्न पार पडावे, अशी प्रार्थना तिने यावेळी केली.



पांढरा सलवार कुर्ता, कानात साजेसे ईअररिंग्स  अशा साध्या सुंदर रूपात दीपिका बाप्पाच्या दरबारात पोहोचली. तिला पाहताच लोकांनी एकच गर्दी केली.  आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक छबी टिपण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. दीपिकाने सर्वांना हसतमुखाने प्रतिसाद दिला.



बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर दीपिका तिथून निघाली. यावेळी चाहत्यांना तिने हात हलवून अभिवादन केले. ‘पद्मावत’मध्ये दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. मात्र करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध चालवला आहे. याच विरोधाअंतर्गत राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंह मकराना यांनी  दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. राजपूत महिलांवर कधीच हात उचलत नाहीत. पण गरज पडली तर आम्ही दीपिकासोबतही तेच करू, जे लक्ष्मणाने शूर्पणखेसोबत केले होते,असे महिपाल म्हणाले होते.



संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे.  या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत अनेक राजकीय पक्ष व राजपूत संघटनांनी ‘पद्मावत’ला विरोध चालवला आहे. हा विरोध लक्षात घेत, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या बंदीमुळे ‘पद्मावत’च्या निर्मात्यांचे कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले असते.  हीच शक्यता लक्षात घेत ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. तथापि सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’वर राज्यांनी घातलेली बंदी घटनाबाह्य ठरवत, या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या २५ तारखेला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होतो आहे.
 




























 

Web Title: Before the release of Padmavat, Deepika Padukone Bappa's court, Siddhi Vinayakara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.