​बोल्ड सीन्स अन् शिव्याची भरमार असलेला ‘कालाकांडी’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 11:27 IST2017-12-07T05:57:38+5:302017-12-07T11:27:38+5:30

आपले नशीब आजमावण्यासाठी सैफ पुन्हा एकदा येत आहे. होय, सैफचा ‘कालाकांडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

Release of 'Kalaakandi' trailer which is full of bold scenes and shivers | ​बोल्ड सीन्स अन् शिव्याची भरमार असलेला ‘कालाकांडी’चा ट्रेलर रिलीज

​बोल्ड सीन्स अन् शिव्याची भरमार असलेला ‘कालाकांडी’चा ट्रेलर रिलीज

िनेता सैफ अली खानचे नशिब अलीकडे रूसून बसले आहेत. अलीकडच्या काळात सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही. काही महिन्यांपूर्वी आलेला ‘शेफ’ हा त्याचा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. पण यानंतरही सैफने हिंमत सोडलेली नाही. आपले नशीब आजमावण्यासाठी सैफ पुन्हा एकदा येत आहे. होय, सैफचा ‘कालाकांडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
‘कालाकांडी’ हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते. आता ते का? याचे उत्तर आपल्याला ट्रेलरमध्ये मिळते. होय, ‘कालाकांडी’च्या ट्रेलरमध्ये बोल्ड सीन्स आणि शिव्यांची भरमार आहे. सैफ कॅन्सरने पीडित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. 



 सैफला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान होते. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. नंतर सैफ वेगवेगळ्या झोनमध्ये जातो, असे ट्रेलरमध्ये दिसते. याचदरम्यान ट्रेलरमध्ये दीपक डोबरियाल आणि विजय राज यांची एन्ट्री दाखवली आहे. हे दोघेही पैशाचे लोभी असतात. शोभिता धुलिपाला आणि कुणाल राय कपूर यांचे प्रेम आणि अक्षय ओबेरॉय याची वासना हेही ट्रेलरमध्ये दिसते. चित्रपटाचे ट्रेलर कुठेतरी तुम्हाला ‘डेल्ही बेली’ची आठवण करून देतो. पण सुरवातीपासूनच ट्रेलर तुम्हाला बांधून ठेवतो आणि पूर्ण बघण्यासाठी प्रवृत्त करतो. सैफची विचित्र हेअरस्टाईल, त्याचे फरकोटमधील लूक सगळेच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करते.

ALSO READ : लग्नासाठी करिना कपूर खानने सैफ अली खानला घातली होती ही अट

‘कालाकांडी’ आधी यावर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता तो येत्या १२ जानेवारीला रिलीज होत आहे.  या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. यापूर्वी अक्षतने ‘डेल्ही बेली’ची पटकथा लिहिली होती. या चित्रपटात सैफशिवाय कुणाल राय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, अक्षय ओबेरॉय, इशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील आदी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

Web Title: Release of 'Kalaakandi' trailer which is full of bold scenes and shivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.