रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:45 IST2021-03-03T16:42:41+5:302021-03-03T16:45:01+5:30

रेखा आणि संजय दत्त यांनी लपून छपून लग्न केले होते अशी चर्चा त्याकाळात मीडियात गाजली होती.

Rekha married Sanjay Dutt in a secret ceremony? | रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी?

रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी?

ठळक मुद्देरेखा आणि संजय जमीन आस्मान या चित्रपटात काम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असे देखील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.

रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. रेखा आणि संजय दत्त एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी लपून छपून लग्न केले होते अशी चर्चा त्याकाळात मीडियात गाजली होती.

संजय दत्तने तीन लग्नं केली आहेत. पण त्याने तीन नव्हे चार लग्न केली असून पहिले लग्न रेखा यांच्यासोबत केले अशी चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात झाली होती. रेखा: द अनटोल्ड स्टोरी या बायोग्राफीमध्ये संजय आणि रेखा यांच्याविषयी लिहिले गेेले असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. पण या पुस्तकाचे लेखक यासीर उस्मान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, अशा कोणत्याही गोष्टीचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला नाहीये. लोकांनी पुस्तक व्यवस्थित वाचलेले नाहीये असे मला वाटते. 

त्यांनी पुढे सांगितले होेते की, रेखा आणि संजय जमीन आस्मान या चित्रपटात काम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असे देखील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. त्यामुळे संजयने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले होते.

Web Title: Rekha married Sanjay Dutt in a secret ceremony?