दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं निर्मात्याला पडलं महागात, गमावावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:53 IST2025-04-16T15:52:43+5:302025-04-16T15:53:18+5:30

अभिनेत्रीला सिनेमात कास्ट केले नाही, म्हणून दाऊदच्या माणसाने निर्मात्याची हत्या केली होती.

Rejecting Dawood's girlfriend cost the producer dearly, he had to lose his life. | दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं निर्मात्याला पडलं महागात, गमावावा लागला जीव

दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं निर्मात्याला पडलं महागात, गमावावा लागला जीव

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील संबंध खूप जुना आहे. ८० आणि ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्डचा धाक इतका होता की सर्वांमध्ये दहशत होती. असेही म्हटले जाते की ९० च्या दशकात अंडरवर्ल्डमधील लोक बॉलिवूड चित्रपटांवर पैसे गुंतवत असत. एवढेच नाही तर तो दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर त्यांच्या जवळच्या अभिनेत्रींना त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी दबाव आणायचा. दाऊद इब्राहिम(Dawood Ibrahim)चे नाव बॉलिवूडमधील अनेक सुंदरींशी जोडले गेले होते. यात 'राम तेरी गंगा मैली' मधील 'मंदाकिनी' पासून ते ममता कुलकर्णीपर्यंतच्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. दाऊदसोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रींमध्ये एक नाव आहे अनिता अयुब(Anita Ayub)चे. जी एकेकाळी देव आनंदची नायिका होती. 

देव आनंदचा 'प्यार का ताराना' हा चित्रपट पाकिस्तानातील रहिवासी असलेल्या अनिता अयुबसाठी बॉलिवूडमध्ये नशिबाचे दरवाजे उघडणारा होता. 'प्यार का तराना' चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते आणि अक्षय आनंद, मिंक ब्रार, गिरिजा शंकर, सुषमा सेठ, श्रीराम लागू यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट ३ सप्टेंबर १९९३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर तिने उर्दूमधील 'सब का बाप', पंजाबीमधील 'चलती का नाम गाडी' आणि मारियामध्ये काम केले. यानंतर, अभिनेत्रीला पुन्हा एकदा १९९५ मध्ये 'गँगस्टर' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 'गँगस्टर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि अनिता अयुबची बॉलिवूडमधील कारकीर्द अवघ्या २ वर्षातच संपली. मात्र, अनिता एका कारणामुळे चर्चेत आली आणि ती म्हणजे दाऊद इब्राहिमसोबतची तिची प्रेमकहाणी.

अनितामुळे निर्मात्याचा झाला मृत्यू?
अनिता अयुबने दाऊदसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी कधीच केली नाही, परंतु ई-टाईम्समधील वृत्तानुसार, अनितामुळे एका बॉलिवूड निर्मात्याला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना १९९५ ची आहे, जेव्हा निर्माते जावेद सिद्दीकीने त्यांच्या बॉलिवूड चित्रपटात अनिता अयुबला कास्ट करण्यास नकार दिला होता, परिणामी दाऊदच्या एका माणसाने निर्मात्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. जावेद सिद्दीकीसोबतच्या या घटनेनंतर, इंडस्ट्रीतील अनेकांनी तिचा दाऊदशी संबंध असल्याचे मानले होते. रिपोर्ट्सनुसार, ९०च्या दशकात एका पाकिस्तानी मासिकाने अशी बातमी प्रकाशित केली होती की, बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोक अनिताला पाकिस्तानी गुप्तहेर मानत होते. या घटनेनंतर, अभिनेत्रीचे बॉलिवूडमधील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

वर्कफ्रंट
अनिता अयुबच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर तिने १९८७ मध्ये पाकिस्तानी टीव्ही नाटक 'गर्दिश'द्वारे अभिनय जगात पहिल्यांदा प्रवेश केला. यानंतर तिने हसीना-ए-आलम, ईद फ्लाइट, दूसरा रास्ता अशा अनेक शोमध्ये काम केले. आता, अनिता सिनेइंडस्ट्रीपासून दूर गेली आहे आणि न्यू यॉर्कमध्ये तिच्या बिझनेसमन पतीसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

Web Title: Rejecting Dawood's girlfriend cost the producer dearly, he had to lose his life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.