अश्लिल फोटोशूटमुळे वादात सापडली होती ही अभिनेत्री, लग्नानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 11:16 IST2019-10-29T11:15:22+5:302019-10-29T11:16:39+5:30
मालामाल वीकली, जाल-दी ट्रॅप आणि गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या चित्रपटांत दमदार अॅक्टिंग करणारी या अभिनेत्रीला यशाने हुलकावणी दिली आणि ती ...

अश्लिल फोटोशूटमुळे वादात सापडली होती ही अभिनेत्री, लग्नानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम
मालामाल वीकली, जाल-दी ट्रॅप आणि गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या चित्रपटांत दमदार अॅक्टिंग करणारी या अभिनेत्रीला यशाने हुलकावणी दिली आणि ती संसारात रमली. या अभिनेत्रीचे नाव आहे रिमा सेन. आज रिमा सेनचा वाढदिवस. रिमाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये केवळ आठ सिनेमांत काम केले. पण तिला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. मग काय, बॉलिवूड सोडून तिने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
कोलकात्यात जन्मलेल्या रिमाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई गाठली. कुटुंबासोबत ती मुंबईला शिफ्ट झाली. पुढे तिला मॉडेलिंगची दुनिया खुणावू लागली. मॉडेलिंग करताना रिमाने अनेक जाहिरातीत काम केले आणि याचदरम्यान तिला तेलगु चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. रिमाचा पहिला तेलगू चित्रपट होता, ‘चित्रम’. हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. यानंतर रिमाने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
‘हम हो गए आपके’ या चित्रपटाद्वारे रिमाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. यात रिमाच्या अपोझिट फरदीन खान मुख्य भूमिकेत होता. 2001 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट दणकून आपटला. पुढे रिमाच्या वाट्याला भूमिका आल्यात. पण त्या सगळ्या सहाय्यक अभिनेत्रीच्या.
2006 मध्ये रिमाने एक फोटोशूट केले. पण तिचे हे फोटोशूट वादात सापडले. तामिळ न्यूजपेपरसाठी केलेल्या या फोटोशूट प्रकरणी रिमाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाला होता. रिमासोबत या प्रकरणात शिल्पा शेट्टीचेही नाव होते. रिमा व शिल्पाचे हे फोटोशूट अश्लिल असल्याचा आरोप होता.
2012 मध्ये रिमा ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये दिसली. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा झाली. पण करिअरमध्ये रिमाला याचा काहीही फायदा झाला नाही. याचवर्षी तिने बिझनेसमॅन शिवकरण सिंगसोबत लग्न केले. सध्या रिमा तिच्या मॅरेज लाईफमध्ये आनंदी आहे. तिला एक मुलगाही आहे.