या कारणामुळे प्रभासच्या साहोच्या सेटवरील सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:38 IST2017-10-14T10:08:52+5:302017-10-14T15:38:52+5:30
बाहुबलीच्या रिलीजनंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. आज तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. प्रभासने नुकतेच त्याचा आगामी ...

या कारणामुळे प्रभासच्या साहोच्या सेटवरील सुरक्षा वाढवली
ब हुबलीच्या रिलीजनंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. आज तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. प्रभासने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट साहोच्या शूटिंगले पहिले शेड्युल संपवले आहे. लवकरच या चित्रपटाचे दुसरे शेड्युलही सुरु होणार आहे. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. साहोचे दुसरे शेड्यूल सुरु करण्यापूर्वी सेटवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या मागचे कारण आहे आता बाहुबलीला पाहण्यासाठी रोज हजारो लोक येतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास जेव्हा ‘साहो’च्या सेटवर जातो तेव्हा तिथे त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स खूप गर्दी करतात. जेव्हा त्याच्या फॅन्सना कळते की आपला आवडता बाहुबली आपल्या जवळपास आहे तेव्हा ते त्याचा नावाने जोर जोरात ओरडू लागतात. बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासची क्रेझ वाढल्याचे दिसून येते. यामुळेच साहोच्या सेटवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर प्रभासच्या खासगी सुरक्षेतही दुपट्टीने वाढ करण्यात आली आहे. ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यांना त्याचा सिनेमातील लूक लीक होऊ नये असे वाटते. म्हणूनच त्यांनी त्याच्या खासगी सुरक्षेतही वाढ आली असल्याचे समजते.
प्रभासचा आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात श्रद्धाचा डबल रोल आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट 150 कोटी रुपये इतके आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा एक अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे.
ALSO READ : बाहुबली फेम प्रभासला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात होत रस
काही दिवसांपूर्वी प्रभास आणि अनुष्का शेट्टी लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अनुष्का आणि प्रभास येत्या डिसेंबरमध्ये साखरपुडा करणार असल्याची बातमी आहे. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या वेळोवेळी नाकारल्या आहेत. आम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे दोघेही सांगत आले आहेत.