या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:57 IST2017-10-05T07:27:14+5:302017-10-05T12:57:14+5:30

रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे समीकरण बॉक्स ऑफिसवर हिट आहे. रोहित आणि अजय जेव्हा-जेव्हा एकत्र येऊन चित्रपट तयार ...

For this reason, Rohit Shetty does not make a film with Salman Khan | या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट

या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट

हित शेट्टी आणि अजय देवगण हे समीकरण बॉक्स ऑफिसवर हिट आहे. रोहित आणि अजय जेव्हा-जेव्हा एकत्र येऊन चित्रपट तयार करतात तेव्हा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार होतात. अजयशिवाय रोहित शेट्टीने शाहरुख खानसोबत सुद्धा काम केले आहे आणि आता तो नवा चित्रपट रणवीर सिंगसोबत तयार करणार आहे. रोहित शेट्टीकडे बॉलिवूडचा एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून बघितले जाते. तुम्ही यशाच्या या शिखरावर पोहोचल्यावर सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा असते. मात्र रोहित शेट्टीचे जरा वेगळे आहे. त्याला सलमान खानसोबत काम करायचे आहे मात्र त्याच्या लायक चित्रपट सध्या रोहित शेट्टीकडे नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.     

रोहितच्या म्हणण्यानुसार, लोक मला नेहमीच सांगतात की तुझी आणि सलमानची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालेल. माझी पण त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. जस मी शाहरुख खानसोबत चेन्नई एक्स्प्रेसमध्ये केले होते. मात्र अडचण ही आहे की सध्या माझ्याकडे सलमान खानच्या लायक कोणती स्क्रिप्टच नाही आहे.     
रोहित शेट्टीचे म्हणणे पचायला थोडे अवघड आहे कारण सलमान आणि रोहित दोघांच्या ही चित्रपटात भरपूर मसाला असतो. अशात रोहित शेट्टीकडे सलमान खानसाठी एक चांगली स्क्रिप्ट नाहीये हे थोडसे समजून घ्यायला अवघड आहे. कदाचित रोहित शेट्टीला दिलवाले चित्रपटानंतर कोणताच चान्स घ्यायचा नाही आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. भलेही रोहित शेट्टीला वाटत असेल त्याच्याकडे सध्या सलमान खान लायक स्क्रिप्ट नाही आहे. देव करो आणि रोहितला सलमान लायक स्क्रिप्ट लवकरच मिळू दे म्हणजे सलमान आणि रोहितची हिट जोडी प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर बघायला मिळेल. 

ALSO RAED :  Bigg Boss 11 : आजही सलमान खान त्या व्यक्तीला विसरू शकला नाही,जाणून घ्या कोण आहे तो?

रोहित शेट्टीचा गोलमान अगेन चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है ख्रिसमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने या चित्रपटाची शूटिंग आबुधाबीमध्ये पूर्ण केली आहे. 

Web Title: For this reason, Rohit Shetty does not make a film with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.