या कारणामुळे गाडीत बसून रडली राणी मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 13:15 IST2018-01-13T07:42:49+5:302018-01-13T13:15:56+5:30

काही काळ ब्रेक घेतल्यानंतर राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपले कमबॅक करण्यास तयार झाली आहे. एक शिक्षिकेच्या भूमिकेतून ...

For this reason, Rani Rani Mukherjee, sitting in the car, ruddles | या कारणामुळे गाडीत बसून रडली राणी मुखर्जी

या कारणामुळे गाडीत बसून रडली राणी मुखर्जी

ही काळ ब्रेक घेतल्यानंतर राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपले कमबॅक करण्यास तयार झाली आहे. एक शिक्षिकेच्या भूमिकेतून ती पदार्पण करणार आहे. सध्या राणी आपला आगामी चित्रपट हिचकीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशन दरम्यान मीडियाशी बोलताना राणीने आपला एक वैयक्तिक प्रसंग शेअर करताना भावूक झाली. राणी म्हणाली की, ''आई झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी हिचकीच्या शूटिंगसाठी सेटवर जायला निघाली तेव्हा ती रडू कोसळले होते. त्या मागचे कारण होते तिची मुलगी आदिरा. आदिराला घरी सोडून राणीला शूटिंगसाठी जावं लागायचे. हिचकीच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी जशी घरातून निघून गाडी जाऊन बसले तसे मला रडू आलं. गाडीत त्यावेळी ड्रायव्हर असल्याने मी माझ्या भावनांना आवर घातला. मला सारखा वाटायचे जेव्हा आदिरा झोपेतून उठले आणि रडले त्यावेळी मी काय करेन. जर तिने मला बघण्याचा हट्ट केला तर मी काय करेन. पण मला असे वाटते माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहे तिने मला शूटिंग दरम्यान चांगली साथ दिली.     

ALSO RAED :   OMG!! राणी मुखर्जीनेही केली सलमान खानसारखीच ‘चोरी’!


आदिराला राणी आणि आदित्य चोप्राने नेहमीच प्रसार माध्यमांच्या कॅमेरापासून लांब ठेवले. काही दिवसांपूर्वी आदिराने आपला पहिला वाढदिवस साजरा केला. तिचे बालपण हिरावू नये म्हणून तिला आम्ही मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लांब ठेवण्याचा निर्णय मी आणि आदित्यने घेतल्याचे राणी सांगते.  राणीने आदित्यशी राणी एप्रिल 2014 ला दोघांनी इटली मधून जाऊन लग्न केले. मर्दानी चित्रपटानंतर राणी आदिरामध्ये व्यस्त झाली. त्यामुळे तब्बल चार वर्षानंतर राणी कमबॅक करते आहे. या चित्रपटात  राणीने टॉरेट सिंड्रोमने पीडित असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. यात व्यक्तिला सतत उचकी लागते. या ‘हिचकी’मुळे ती अनेकदा आपले म्हणणे पूर्ण करू शकत नाही. तिला टीचर बनायचे असते. यासाठी ती अनेक मुलाखती देते. पण तिचा वाणी दोष तिच्या या स्वप्नाच्या आड येतो. पण म्हणतात ना, प्रयत्नांनी परमेश्वर. एक शाळा तिला नोकरी देते. या शाळेत काही खोडकर मुलांसोबत तिची गाठ पडते. ही मुले राणीला त्रासवून सोडतात. तिच्या ‘हिचकी’वरून तिना नाही नाही ते बोलतात. राणीने यात नैना माथूर नामक महिलेचे पात्र साकारले आहे.

Web Title: For this reason, Rani Rani Mukherjee, sitting in the car, ruddles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.