​हे आहे ‘जग्गा जासूस’ रखडण्यामागचे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 20:05 IST2016-08-27T14:35:01+5:302016-08-27T20:05:01+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले. पण याऊपरही व्यावसायिक कारणाने का असेना कॅट व रणबीर ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने ...

This is the reason behind the 'Jagga Spies' stopping !! | ​हे आहे ‘जग्गा जासूस’ रखडण्यामागचे कारण!!

​हे आहे ‘जग्गा जासूस’ रखडण्यामागचे कारण!!

टरिना कैफ आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले. पण याऊपरही व्यावसायिक कारणाने का असेना कॅट व रणबीर ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने एक आले. अनुराग बसूच्या या चित्रपटाचे धडाक्यात शूटींग सुरु झाले खरे. पण तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटाशी संबंधित रोज नवा वाद कानावर पडू लागला. कधी कॅट व रणबीर सेटवर एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नसल्याचे, असे कानावर आले तर कधी अनुराग बसूंच्या मनासारखा चित्रपट तयार झाला नसल्याचेही ऐकू आले. इतकेच नाही तर कॅटरिनाकडे डेट्स नसल्याने चित्रपट लांबल्याचेही समजले. मग काय, याबाबत खुद्द कॅटलाच विचारण्यात आले. पण कॅटने मात्र सरळ सरळ कानावर हात ठेवले. माझ्याकडे डेट्स नव्हत्या म्हणून ‘जग्गा जासूस’ रखडला, असे अजिबात नाही. शूटींग लांबले, याला दुसरे तिसरे कुणी जबाबदार नसून स्वत: अनुराग बसू जबाबदार आहेत, असे एका श्वासात कॅट बोलून गेली. अर्थात आपण भलतचं बोलून गेल्याचे कॅटच्या लगेच लक्षात आले. मग काय, तिने गोष्ट शिताफीने पलटवली. अनुरागने चित्रीकरणास वेळ लावला. कारण त्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असते. प्रत्येक सीन तो कित्येकदा पाहतो आणि समाधानी होईपर्यंत, पुन्हा पुन्हा करायला लावतो. साहजिक चित्रीकरण लांबणारच, असे कॅट म्हणाली. आहे ना कॅट चतूर??

Web Title: This is the reason behind the 'Jagga Spies' stopping !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.