या कारणामुळे 'बाहुबली' अभिनेता प्रभासने नाकारली 10 कोटींच्या जाहिरातीच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 13:53 IST2017-05-06T08:23:23+5:302017-05-06T13:53:23+5:30

सध्या सगळ्यांच्या ओठावर एकच नाव आणि एकच चर्चा ऐकायला मिळतेय. ती म्हणजे बाहुबली  या सिनेमाची. 'बाहुबली द बिगिनिंग'च्या यशानंतर ...

For this reason, 'Bahubali' actor Prabhas has refused to offer advertisements worth Rs. 10 crores | या कारणामुळे 'बाहुबली' अभिनेता प्रभासने नाकारली 10 कोटींच्या जाहिरातीच्या ऑफर्स

या कारणामुळे 'बाहुबली' अभिनेता प्रभासने नाकारली 10 कोटींच्या जाहिरातीच्या ऑफर्स

्या सगळ्यांच्या ओठावर एकच नाव आणि एकच चर्चा ऐकायला मिळतेय. ती म्हणजे बाहुबली  या सिनेमाची. 'बाहुबली द बिगिनिंग'च्या यशानंतर देशभरात फक्त आणि फक्त 'बाहुबली द कन्क्लुजन' या सिनेमाची चर्चा आहे. 'बाहुबली द कन्क्लुजन' या सिनेमाचा डंका देशातच नाही तर जगभरात गाजतो आहे. या सिनेमाची तिकीट खिडकीवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरु आहेत. या सिनेमासोबतच बाहुबली फेम अभिनेता प्रभास हा सुद्धा सिनेरसिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. प्रभास रसिकांचा लाडका स्टार बनला असून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.प्रभासचे हे यश या सिनेमापासून सुरु नसून बाहुबली द बिगिनिंगपासून प्रभासला लोकप्रियता मिळते आहे. बाहुबली द बिगिनिंग या सिनेमाच्या यशानंतर प्रभास तरुणींचाही लाडका बनला होता.त्याला सहा हजार लग्नाच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र प्रभासने सगळे लग्नाचे प्रस्ताव नाकारले. त्याला नवनवीन बॉलिवूड सिनेमाच्या ऑफर्स आणि जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. इतकंच नाही तर त्यानं एक दहा कोटींची जाहिरातसुद्धा नाकारली होती. या सगळ्याचं एकच कारण होतं ते म्हणजे 'बाहुबली द कन्कल्युजन' हा सिनेमा. या सिनेमाच्या शुटिंगवर प्रभासला सगळं लक्ष केंद्रीत करायचं होतं. पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर येणा-या बहुतांशी ऑफर्स स्टार्स निवडतात. त्यात बॉलिवूडच्या सिनेमाची ऑफर तर कुणीच नाकारु शकत नाही. मात्र ते धाडसही प्रभासने दाखवले कारण त्याला बाहुबली द कन्कल्युजन या सिनेमाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट करायची नव्हती. बाहुबली द कन्क्लुजन या सिनेमासाठी प्रभासला 25 कोटी रुपये मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या कामावर असलेली श्रद्धा आणि एस.एस. राजामौली यांना दिलेलं वचन यामुळे प्रभासने सगळ्या गोष्टींचा त्याग करुन फक्त आणि फक्त बाहुबली द कन्कल्युजन या सिनेमावर आपलं लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे आता या सिनेमाच्या यशामुळे त्याला रसिकांच्या प्रेमासोबतच एस.एस. राजमौली यांचाही तो फेव्हरेट बनला आहे.प्रभासबद्दल एकच म्हणावं लागेल की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता..

Web Title: For this reason, 'Bahubali' actor Prabhas has refused to offer advertisements worth Rs. 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.