रिअॅलिटी शोमुळे ‘या’ कलाकारांचे पालटले नशीब, बॉलिवूडमध्ये मिळाली एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 15:43 IST2017-09-03T10:00:55+5:302017-09-03T15:43:49+5:30
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांना अभिनय, डान्सिंग आणि सिंगिंगच्या कौशल्याची जणूकाही देणगीच मिळाली आहे. ज्यामुळे ...
.jpg)
रिअॅलिटी शोमुळे ‘या’ कलाकारांचे पालटले नशीब, बॉलिवूडमध्ये मिळाली एंट्री!
सनी लिओनी
बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून सनी लिओनीला ओळखले जाते. मात्र सनी लिओनीला बॉलिवूडमध्ये एंट्री ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे मिळाली हेही तेवढेच खरे आहे. सनी लिओनीला महेश भट्ट यांनी बिग बॉसच्या घरात बघितले होते. त्याठिकाणी दोघांची भेटही झाली होती. त्याचवेळी त्यांनी घोषणा केली होती की, त्यांच्या आगामी चित्रपटाची अभिनेत्री सनी असेल. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा चालला नव्हता, परंतु सनीला या चित्रपटाने चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. लवकरच सनीचा अरबाज खानसोबतचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.
एली अवराम
अभिनेत्री एली अवराम हीदेखील चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली. एलीला बॉलिवूडमध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळेच एंट्री मिळाली.
प्रिन्स नरूला
बिग बॉस सीजन-९ चा विजेता असलेला प्रिन्स नरूला याने एमटीव्ही रोडीज एक्स-२ आणि एमटीव्ही रोडीज स्प्लिटसव्हिला-८ चा ताज आपल्या नावावर करून घेतला. या शोमुळे प्रिन्सला एवढी लोकप्रियता मिळाली की, तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची तयारी करीत आहे. सध्या तो ‘बडो बहू’ या मालिकेत काम करीत आहे.
सलमान युसूफ खान
डान्स क्षेत्रात बरेचसे असे कोरिओग्राफर आहेत, ज्यांना रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. त्यातीलच एक सलमान नाव युसूफ खान हे आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचा विजेता असलेला सलमानला इंडस्ट्रीमध्ये एक सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर म्हणून ओळखले जाते. आपल्या अनोख्या डान्स कौशल्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली. सध्या तो दबंग सलमान खानच्या ‘जिंदा है टायगर’ या चित्रपटावर काम करीत आहे.
कपिल शर्मा
कॉमेडीयन कपिल शर्मा याच्या प्रसिद्धीविषयी फारसे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण कपिलला आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ओळखून आहेत. ‘कॉमेडी नाइट विद कपिल’ या त्याच्या स्वत:च्या शोमुळे तर तो घराघरात पोहोचला आहे. कपिलने ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तो इतरही चित्रपटांवर सध्या काम करीत आहे.
राघव जुयाल
स्लो मोशन डान्सचा किंग म्हणून ओळखला जाणारा राघव जुयाल याला ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोने प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविले. सध्या राघवला इंडस्ट्रीत एक चांगला कोरिओग्राफर म्हणून ओळखले जाते. ‘एबीसीडी-३’मध्ये राघवने श्रद्धा कपूर आणि वरुण धवनला डान्सची ट्रेनिंग दिली. सध्या तो ‘डान्स प्लस’चा सीजन होस्ट करीत आहे.